धक्कादायक! सांगोला तालुक्यातील रहिवासी ग्रामसेवक मंगळवेढा पंचायत
समितीमध्ये चक्कर येऊन पडल्याने मृत्यू, नेमकं कारण काय?
मंगळवेढा तालुक्यातील मूढवी व सलगर (खु) येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक दत्तात्रय आप्पाराव इंगोले (वय ५२ रा. वाढेगाव ता. सांगोला) हे मंगळवेढा पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात चक्कर येवून पडल्याने ह्रदय विकाराचा झटका येवून मयत झाल्याची घटना घडली असून
याची मंगळवेढा पोलीसात अकस्मात मयत अशी नोंद झाली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत ग्रामसेवक दत्तात्रय इंगोले हे सलगर (खु) व आसबेवाडी येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असून ते पंचायत समिती कामगार कॉलनी मध्ये रहावयास आहेत.
दि. ५ रोजी सकाळी १०.२५ वाजता पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात अचानक चक्कर येवून पडल्याने यातील खबर देणारे त्यांचा मुलगा अमित दत्तात्रय इंगोले यांनी मयत दत्तात्रय इंगोले यास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे घेवून गेले होते, तेथील डॉक्टरांनी तपासून ते हृदयविकाराच्या झटक्याने मयत झाल्याचे सांगितले.
त्यांची विविध ठिकाणी २७ वर्षे सेवा झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. नुकतीच त्यांना ग्रामविकास अधिकारी म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली होती. सूरसंगम ग्रुपच्या गायिका संगीता इंगोले यांचे ते पती होत.
पोलीसांनी व्हीसेरा राखून ठेवला असून याचा अधिक तपास पोलीस नाईक ईश्वर दुधाळ हे करीत आहेत.
0 Comments