ब्रेकिंग न्यूज...मोहिते-पाटील व निंबाळकर वादात भाजपने पर्याय शोधला;
सदाभाऊंना माढ्यातून उभा करण्याच्या तयारीत
लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असताना खासदार रणजितसिंह निंबाळकर व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे दोन्ही गट सोशल मीडिया वर एकमेकांविरोधात टीका करत आहेत.
मोहिते पाटलांनी तर आपले सर्व कार्यकर्ते खासदार विरोधात सोशल मीडियावर ऍक्टिव्ह केले असताना याचा फटका भविष्यात भारतीय जनता पार्टीला बसणार आहे. यामुळे माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी भाजप सदाभाऊ खोत यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे.
गेल्या १५ वर्षांपासून सदाभाऊ खोत यांचा माढा लोकसभा मतदारसंघाचा दांडगा अनुभव आहे. ऊस आंदोलन दूध आंदोलन शेतकरी प्रश्नावर त्यांनी सोलापूर जिल्हा पिंजून काढलेला आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्याविरोधात सदाभाऊंचा 13,000 मतांनी पराभव झाला होता. माढ्याचा तिढा जर सोडवायचा असेल या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून आणायचा
असेल तर सर्वांनी मिळून गटतट बाजूला ठेवून या निवडणुकीला सामोरे जाणं गरजेचं आहे. असे असताना मोहिते पाटलांच्या भूमिकेमुळे माढ्यात भाजपला फटका बसतो की काय अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे.
0 Comments