धक्कादायक प्रकार....शाळा शिक... माेठा हाे... आई - वडील रागावले,
नववीच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन सोलापूर जिल्ह्यातील घटना...
किरकाेळ कारणावरुन आज पुन्हा एका अल्पवयीन मुलाने त्याचे जीवन संपविल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात समाेर आली आहे. गेल्या दाेन दिवसांत अल्पवयीन मुलांनी जीवन संपविल्याची ही तिसरी घटना साेलापूर जिल्ह्यातून समाेर आली आहे.
पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार आई-वडील अभ्यास कर, शाळा चांगली शिक म्हणून सांगितल्याच्या कारणावरून मनात राग धरून नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरात आत्महत्या केली.
आकाश अनिल गायकवाड (वय १५) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.आकाश अनिल गायकवाड हा नववीच्या वर्गात शिकत होता.
आकाशला शाळा व्यवस्थित शिक, शाळा व्यवस्थित शिकला नाहीस तर जनावरे राखावी लागतील असे बोलून आई-वडील बार्शीला गेले होते.
आई-वडील बोलल्याचा राग मनात धरून आकाशने राहत्या घरात आत्महत्या केली. आई-वडील बार्शीहून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर तत्काळ पांगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले
असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. याबाबत पांगरी पोलीस स्टेशनमध्ये मयत आकाश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments