google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील खिलारवाडी माध्यमिक विद्यालयाचे श्री.संजय भोसले आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

Breaking News

सांगोला तालुक्यातील खिलारवाडी माध्यमिक विद्यालयाचे श्री.संजय भोसले आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

सांगोला तालुक्यातील खिलारवाडी माध्यमिक विद्यालयाचे


श्री.संजय भोसले आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित       
        

सांगोला (प्रतिनिधी) शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२):

 विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने व माजी आमदार मा. दत्तात्रय सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 

खिलारवाडी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय भोसले यांना 

आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन आमदार दत्तात्रय सावंत, सोलापूरच्या माजी महापौर नलिनी चंदिले व सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. अक्षय भैय्या वाकसे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.    

याप्रसंगी राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. बापूसाहेब अडसूळ व प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल, प्रदेश समन्वयक गंगाधर पडणुरे तसेच सोलापूर जिल्हा शिक्षक व कर्मचारी पतसंस्था बाळेचे चेअरमन समाधान घाडगे, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे 

जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर, विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष व नगरसेविका संगीता जाधव व शहराध्यक्ष मीनाक्षी जाधव, मुख्याध्यापिका निर्मला भोसले सामाजिक कार्यकर्त्या जयश्री गवळी व अनुराधा खारे आदी मान्यवर उपस्थित होते. 

पुरस्कार मिळाल्याने संजय भोसले यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Post a Comment

0 Comments