सांगोला तालुक्यात दिड एकर क्षेत्रात तैवान पिंक पेरु वाणाची लागवड करुन अजनाळे येथील
शेतकऱ्यास २३ लाख रू विक्रमी उत्पन्न अजनाळे येथील प्रगतशिल शेतकरी विजयदादा येलपले मालामाल...
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
प्रगतशिल शेतकरी विजयदादा येलपले यांनी दिड एकर क्षेत्रामध्ये तैवान पिंक पेरू वाणाची लागवड करुन ५ लाख खर्च वजा जाता ४० टन पेरुच्या उत्पादनातुन सरासरी ७० रू दर प्रमाणे २३ लाख रूपये विक्रमी उत्पन्न मिळवुन मालामाल झाले आहेत.
सांगोल्यापासून अवघ्या पंधरा किलोमिटर अंतरावर असलेल्या ५२७८ लोकसंख्या असलेल्या अजनाळे गावातील शेतकऱ्यांनी डाळिंब उत्पादनाच्या बाबतीत अनेक विक्रम करत क्रांती केली आहे.
डाळिंब या एकाच पिकाच्या मागे न लागाता विजय येलपले यांनी दिड एकर क्षेत्रात मागील चार वर्षापूर्वी तैवान पिंक पेरूची १२ बाय ७ वर या अंतरावर ६०० रोपांची लागवड केली आहे
त्यांच्या या पाचव्या पिकाच्या वेळी १५ एप्रिल रोजी पेरू बागेचा बहार धरला असुन पहिला तोडा सप्टेंबर महिन्यात पेरु पिकाची विक्रमी दर घेवुन केरळ, तामिळनाडु, दिल्ली येथिल बाजारपेठेत विक्री करत असल्याचे येलपले यांनी सांगितले.
सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेणखताचा वापर करुन तैवान पिंक पेरु चांगल्या पद्धतीने येत असल्यामुळे बाजारपेठेत या वाणाला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.
गावातील शेतकऱ्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून खडकाळ माळरानावर डाळिंब पिकाची लागवड करुन कष्ट जिद्द चिकटच्या जोरावर भरघोस उत्पादन घेतले आहे
मात्र बदलत्या हवामानामुळे डाळिंब पिकावर तेल्या,मर यासारख्या रोगाने प्रादुर्भाव केल्यामुळे गावातील ८० टक्के डाळिंबाच्या बागा उध्वस्त झाले आहेत त्यामुळे येथील शेतकरी सिमला मिरची, द्राक्ष,दोडका, पेरू यासारख्या पिकाकडे वळला आहे.
येलपले यांनी खचुन न जाता पेरू यासारखी पिके घेऊन भरघोस उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्यांनी जास्त शेती करण्यापेक्षा कमी क्षेत्रामध्ये पेरू सारख्या वाणाची लागवड करून भरघोस उत्पादन घेता येते असल्याचे येलपले यांनी सांगितले.
0 Comments