बांगलादेशातील नोआखलित इंटरनॅशनल युथ पीस कॅम्पमध्ये भारत ,बांगलादेश, नेपाळ ,अमेरिका,
इंग्लंडचे 350 नागरिक सहभागी बांगलादेशमध्ये महात्मा गांधीजी अनेक रूपात आजही जिवंत
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
वर्ष 1940 च्या सप्टेंबर ,ऑक्टोबरमध्ये बांगलादेशात मोठ्या दंगली घडत होत्या नोआखलि परिसरात अल्पसंख्याक हिंदूच्या कतली त्यावेळी महात्मा गांधीजी तेथे पोहोचले .
5 नोव्हेंबर 1946 ते 25 फेब्रुवारी 1947 असे 111 दिवस अनवाणी पायाने तब्बल 49 गावात फिरून लोकांना शांततेचे आव्हान केले. सुरुवातीला प्रचंड विरोध झाला
मात्र तरीही त्यांनी तरीही आपले कार्य सुरूच ठेवले व शांतता हिंदू मुस्लिमांमध्ये सद्भावना शांतता प्रस्थापित करण्यात यश मिळवले एवढेच नव्हे तर त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी हिंदूच्या रक्षणाची जबाबदारी सुद्धा घेतली,
त्यानंतर भारतातील बिहारमध्ये हिंदू मुस्लिमांमध्ये सुरू असलेली तेड मिटवण्यासाठी ते बांगलादेशातून परतले व याही ठिकाणी शांतता निर्माण केली येथे सुद्धा हिंदूंनी मुस्लिमांच्या रक्षणाची सुरक्षेची जबाबदारी घेतली
आयुष्यभर शांतता व सद्भावनेसाठी कार्य करणाऱ्या गांधीजींनी पायवाटेने प्रवास केला. लोकांशी संवाद साधला त्यांच्या पाऊलखुणा 77 वर्षानंतर ही कायम साक्षात गांधीजी आपल्या सोबत चालत आहेत
एवढी सजीवता नवाखालीतील शिबिरात अनुभवत असल्याचे असल्याचे नीलकंठ शिंदे सर यांनी सांगितले .राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तर्फे बांगलादेशातील 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर
2023 रोजी दरम्यान आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय युवा संमेलन शिबिरात भारत, बांगलादेश ,नेपाळ ,अमेरिका ,इंग्लंडची 350 नागरिक सहभागी झाले असून यात भारतातील 120 जणांचा समावेश आहे या शिबिरात पहाटे 6:30 ते 9 वाजेपर्यंत विविध कार्यक्रम संपन्न झाले.
30 सप्टेंबर रोजी 11 वाजता ढाका स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे चेअरमन डॉ काझी खोलीकुजामान अहेमद यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले यात प्रमुख पाहुणे म्हणून नोआखालीचे खासदार एच एम इब्राहिम तर अध्यक्षस्थानी गांधी आश्रम ट्रस्टी
बोर्डाचे सेवानिवृत्त चेअरमन मेजर जनरल जीबान कणाई दास, कायदा न्याय व संसदीय कामकाज मंत्रालयाचे सचिव मोहम्मद गोलाम सरावर आदींची उपस्थिती होती. मध्यंतरानंतर 3 ते 5 या वेळेत (क्लायमेट चेंज अँड वॉटर इशू) बदलते हवामान व पाणी समस्या या विषयावर मंथन झाले
यात हिवरेबाजार येथील पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह चार मान्यवरांनी भूमिका मांडली .तदनंतर( क्वीस्ट फोर पीस गांधी अँड बंगाबंधू) शांततेचा शोध गांधी आणि बंगा बंधू या विषयावर मंथन झाले.
3950 किलोमीटर सायकल प्रवास
भारत ,नेपाळ ,भूतान ,बांगलादेश सद्भावना सायकल यात्रेच्या माध्यमातून 9 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान काठमांडू, भूतान नवाखाली ,ढाका 3950 किलोमीटर अंतर सायकलने पार केले. सरपंच पद्मश्री पोपटराव पवार ,
स्नेहालयाचे डॉ गिरीश कुलकर्णी ,स्वाती भटकळ, रेणूताई गावस्कर यांच्यासह भारतभरातून 120 जण यात सहभागी झाले. या ठिकाणी एसडीएसचे संस्थापक मोजीबुर रेहमान यांच्यासह यांच्यासह गांधी आश्रम ट्रस्टकडून शिबिरार्थीचे स्वागत केले.
गांधीधाम येथे येऊन घेतले आशीर्वाद
77 वर्षांपूर्वी हिंदू मुस्लिमांमध्ये दंगल शमवन शांतता व सद्भावना निर्माण करण्यासाठी गांधीजींनी प्रयत्न केले व ते यशस्वी झाले. आजही त्या ठिकाणी लक्ष्मीपूर, नारायणपूर ,रतनपुर अशी हिंदू नावे असलेली शहरे ,गावे ,वाड्या आहेत ते बदलली जात नाहीत .जयंतीनिमित्त मी गांधीधाम येथे येऊन आशीर्वाद घेतले याचा सार्थ अभिमान वाटतो.
नीलकंठ शिंदे ,सर (सांगोला. भारत)
0 Comments