google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बॉलिवूड अभिनेत्रीच्या कारचा भीषण अपघातामध्ये दोघांचा दुर्देवी अंत

Breaking News

बॉलिवूड अभिनेत्रीच्या कारचा भीषण अपघातामध्ये दोघांचा दुर्देवी अंत

 बॉलिवूड अभिनेत्रीच्या कारचा भीषण अपघातामध्ये दोघांचा दुर्देवी अंत


बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खानच्या स्वदेश चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जोशी कार अपघात झाला आहे.

 या रस्ते अपघातात गायत्री आणि तिचा पती विकास ओबेरॉय दोघेही जखमी झाले. तर दुसऱ्या गाडीमध्ये असलेल्या एका स्विस जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात इटलीच्या सार्डिनिया भागात घडला. यावेळी गायत्री जोशी तिचा पती विकास ओबेरॉयसह लॅम्बोर्गिनी कारमधून प्रवास करत होती. 

यावेळी त्यांच्या आजूबाजूला काही आलिशान गाड्याही दिसत आहेत. यादरम्यान एका मिनी ट्रकला ओव्हरटेक करतेवेळी त्यांच्या कारने फेरारी गाडीला जोरदार धडक दिली.

मात्र अचानक ओव्हरटेक करताना, त्यांची लॅम्बोर्गिनी कार फेरारीला धडकते आणि पुढे असलेला मिनी ट्रक हवेत उडतो. यानंतर तो ट्रक पलटी होतो आणि फेरारी कारलाही आग लागते. त्यामुळे त्या कारमध्ये बसलेल्या स्विस जोडप्याचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात मृत्यू झालेले जोडपं हे स्वित्झरलँडला राहणारे आहे. मेलिसा क्रौटली(६३) आणि मार्कस क्रौटली(६७) असे या मृत्यू झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. या अपघातात गायत्री आणि विकास ओबेरॉय यांना दुखापत झाल्याचे बोललं जात आहे.

Post a Comment

0 Comments