ब्रेकिंग! अजितदादांना मुख्यमंत्री बनवू ; फडणवीसांचे मोठे विधान
सध्या राज्यात राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नाराज असल्याचे समोर येत होते. पालकमंत्री पदावरून हा वाद असल्याचे बोलले जात होते.
त्यानंतर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. या सर्व घडामोडीनंतर आज सुधारित पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री बदलणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. त्यातच आता फडणवीस यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. अजितदादा यांना मुख्यमंत्रीपद देण्यावरून फडणवीस यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की,
आम्ही पाच वर्षांसाठी त्यांना मुख्यमंत्री करू. एका मुलाखतीत शिंदे गट आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. जर हे आमदार अपात्र ठरले तर पर्याय म्हणून अजितदादा यांना सोबत घेतले का,
त्यांना पुढील सहा महिने मुख्यमंत्री बनवायचे आहे का, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. कारण, मी सहा महिन्यात परिस्थिती बदलून दाखवतो, असे विधान अजितदादा यांनी अलीकडे केले होते.
यावर फडणवीसांनी खळबळजनक वक्तव्य केले. सहा महिन्यात परिस्थिती बदलत नसते. त्यामुळे, जेव्हा बनवायचे तेव्हा अजितदादा यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू, असे फडणवीस यांनी सांगितले.
0 Comments