google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकाराने बारामती हादरली ! फुकट अंडी दिली नाहीत म्हणून एवढी मारहाण केली की त्याचा जीवच गेला

Breaking News

धक्कादायक प्रकाराने बारामती हादरली ! फुकट अंडी दिली नाहीत म्हणून एवढी मारहाण केली की त्याचा जीवच गेला

 धक्कादायक प्रकाराने बारामती हादरली ! फुकट अंडी दिली नाहीत म्हणून एवढी मारहाण केली की त्याचा जीवच गेला


फुकट अंडी न दिल्याच्या कारणावरून अंडा भुर्जी विक्रेत्याचा मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडला आहे. 

30 सप्टेंबरला बारामती शहरातील टि सी कॉलेज रस्त्यावर शाहबाज रौफ पठाण हा रात्रीच्या वेळी अंडा भुर्जी गाडी लावून विक्री करीत होता. त्यावेळी अंडाभुर्जी विक्रेत्याला अज्ञात इसमाने गंभीर जखमी केले होते. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 जखमीवर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना रविवारी त्याचा मृत्यू झाला.पोलिसांनी अधिक तपास केला असता शहाबाज पठाण यास दारूचे नशेत फुकट अंडी देण्याबाबत एकाने वाद घातल्याची माहिती मिळाली होती. 

त्याप्रमाणे माहिती काढून प्रवीण भानुदास मोरे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचे कडे विचारपूस केली. यावेळी त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने बारामती शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments