प्रा. विकास गोते यांना “इंडियन टॅलेंट अवॉर्ड” २०२३ पुरस्कार जाहीर अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या शिरपेचात मानाचा तुरा
शिरभावी :- हवेली तालुक्यातील उरुळीकांचन गावचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व व एमआयटी कॉलेजचे इंडस्ट्रियल मेंटॉर व सायरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. विकास गोते यांना “इंडियन टॅलेंट अवॉर्ड” २०२३ पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे . टॅलेंट कट्टा या संस्थेकडून देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
शैक्षणिक, तंत्रज्ञान, व्याख्यान व इतर क्षेत्रातील केलेल्या कार्याची दखल घेऊन टॅलेंट कट्टा या संस्थेकडून देण्यात येणारा सन २०२३ या सालातील “इंडियन टॅलेंट अवॉर्ड” २०२३ पुरस्कार प्रा. विकास गोते यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे
टॅलेंट कट्टा या संस्थेच्या निवड समितीने प्रा. विकास गोते यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याने अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले प्रा. विकास गोते यांच्या
व उरुळीकांचन गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे . प्रा. विकास गोते यांचे मूळ गाव बिवरी हे आहे . प्रा. विकास गोते हे उत्कृष्ट प्राध्यापक कसे असावेत याचे एक ज्वलंत उदाहरण आहेत .
विविध महाविद्यालयांमध्ये त्यांनी उपयुक्त अशी व्याख्याने दिली आहेत. प्रा. विकास गोते हे आयटी उद्योगातील ट्रेलब्लेझर आहेत. त्यांना सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचा 12 वर्षांहून अधिक अनुभव आहे.
नाविन्यपूर्ण दृष्टीकोन आणि उत्कृष्ट कार्य यामुळे त्यांनी काम केलेल्या विविध संस्थांमध्ये चांगलाच प्रभाव पाडला आहे. प्रा. विकास गोते सातत्याने उच्च दर्जाचे शिक्षण देतात. त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती नाविन्यपूर्ण आणि आकर्षक आहेत. त्यांच्याकडे तांत्रिक कौशल्य आहे .
तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अतुलनीय ज्ञान आहे. प्रा. विकास गोते यांनी शिक्षण आणि आयटी या दोन्ही क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य केले आहे. शैक्षणिक, तंत्रज्ञान, व्याख्यान व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल
अत्यंत महत्त्वाचा व प्रतिष्ठित समजला जाणारा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती टॅलेंट कट्टा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दिपक जाधव यांच्या कडून निवड पत्राद्वारे देण्यात आली आहे .
टॅलेंट कट्टा या संस्थेकडून समाज, संस्कृती, यांचे संवर्धन व लोकशाही विचारांना एकत्र करणारा आणि जगण्याला ध्येय बनवणार्या ऐतिहासिक गुणवत्तेच्या सर्वश्रेष्ठ मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने राष्ट्र मोठे होते !
या ब्रीदवाक्यानुसार हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे . या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये अनेक प्रतिष्ठित मान्यवरांना “इंडियन टॅलेंट अवॉर्ड” देऊन त्यांचा यथोचित सन्मान टॅलेंट कट्टा या संस्थेकडून करण्यात येणार आहे .
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी निस्वार्थी भावनेने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्तिंना पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. टॅलेंट कट्टा या संस्थेकडून देण्यात येणाऱ्या “इंडियन टॅलेंट अवॉर्ड” २०२३ पुरस्कारासाठी
प्रा. विकास गोते यांची त्यांच्या कार्याची दखल घेऊन निवड करण्यात आली आहे. प्रा. विकास गोते यांची या पुरस्कारासाठी निवड झाली ही त्यांनी केलेल्या कार्याची खरोखरच एक पोहच पावती आहे. टॅलेंट कट्टा या संस्थेकडून या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे
ही खरोखरच खूप अभिमानाची व कौतुकास्पद बाब आहे . तसेच त्यांना या कार्यक्रमात मा.श्री. मेघराज राजेभोसले अध्यक्ष – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, सुप्रसिद्ध अभिनेत्री आर्या घारे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे .
प्रा. विकास गोते यांची शैक्षणिक, तंत्रज्ञान, व्याख्यान व इतर क्षेत्रातील कामगिरी पाहून त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे . या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, गौरवपत्र, मेडल, फेटा, श्रीफळ असे आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा वार रविवार दि. 8 ऑक्टोंबर, 2023 रोजी सकाळी 10.00 ते 1.00 या वेळेत स्थळ : पत्रकार भवन सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे या ठिकाणी पार पडणार आहे . अशी माहिती टॅलेंट कट्टा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दिपक जाधव यांच्याकडून देण्यात आली आहे.
प्रा. विकास गोते यांना “इंडियन टॅलेंट अवॉर्ड” २०२३ हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडून, कॉलेज कडून, ग्रामस्थांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत व इतर सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे तसेच त्यांच्या वरती अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे .
0 Comments