सांगोला विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी जयंती साजरी.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे विचार कोणीही संपवू शकत नाही :-प्रा. विलास पाटील सर
दिनांक:- ०२ ऑक्टोम्बर २०२३ (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी बोलताना प्रा. विलास पाटील सर म्हणाले की, महात्मा गांधीजीनी सत्याग्रह आणि विविध प्रकारे क्रांतिकारी आंदोलने करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज देश कठीण प्रसंगातुन जात असताना या देशाला पुन्हा एकदा गांधी विचारांची देशाला गरज आहे. या देशात महात्मा गांधीजींचे विचार कोणीही संपवू शकत नाही. महात्मा गांधीजीनी ज्या पक्षाला साथ दिली त्या पक्षाचे आपण आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. येणारे दिवस आपल्यासाठी आव्हानाचे आहेत. लोकांची सेवा ही सर्वोकृष्ठ सेवा आहे. लोकांची सेवा करण्याचा आणि लोकशाही आणि संविधान मजबूत करण्यासाठी आपण दृढ़ संकल्प आज करू या असे आवाहन केले.यावेळी जेष्ठ नेते विलास पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रा. सुनील भोरे सर, जेष्ठ नेते विलास पाटील सर शहर अध्यक्ष फिरोज मणेरी , युवक उपाध्यक्ष काशिनाथ ढोले, अक्षय महामुनी ता. उपाध्यक्ष काँग्रेस कमीटी सांगोला , आदी उपस्थित होते.
0 Comments