टेंभू उपसा सिंचन योजनेतून सुमारे ४०० क्युसेक्स विसर्गाने सोडलेले पाणी माण नदीत
पोहचल्याने शेतकरी वर्गाचा आनंद ओसंडून वाहू लागला आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला ( प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२) टेंभू उपसा सिंचन योजनेतून सुमारे ४०० क्युसेक्स विसर्गाने सोडलेले पाणी माण नदीत पोहचल्याने शेतकरी वर्गाचा आनंद ओसंडून वाहू लागला आहे
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व पाणीदार आमदार अँड शहाजी बापू पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे
माण नदीत सोडलेल्या टेंभू च्या पाण्याचे शेतकऱ्यांसह शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके वाजवून खणा नारळाची ओटी पाण्यात सोडून जलपूजन केले. यावेळी शेतकऱ्यांनी शहाजी बापू पाटील यांचा विजय असो... ढाण्या वाघाचा विजय असो.. अशा घोषणा देऊन आनंद व्यक्त केला.
चालू वर्षी मान्सून पूर्व पावसासह सर्वच नक्षत्रातील पावसाने पाठ फिरवल्यामुळे सांगोला तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती दरम्यान मागील तीन महिन्याच्या काळात एकही दमदार पाऊस
न पडल्यामुळे तालुक्यातील ओढे नाले नद्या तसेच तलाव कोरडे पडल्यामुळे शेतीच्या पाण्यासह माणसांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती
तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडे निरा उजवा कालवा, टेंभू व म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून कोरडा नदी, माण नदीत पाणी सोडून नदीवरील सर्व बंधारे भरून घ्यावेत अशी मागणी केली होती
या मागणीची दखल घेऊन आमदार शहाजी बापू पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहात लक्षवेधी सूचना मांडून सदर टेंभू ,म्हैसाळ योजनेतून माण व कोरडा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती तर याबाबत,
आ.पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही लेखी पत्र देऊन पाणी सोडण्याची मागणी लावून धरली होती.अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे टेंभूचे पाणी माण नदीत सोडल्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.
सुमारे ४०० क्युसेक्स वेगाने पाणी बलवडीपासून ते मेथवडे बंधाऱ्याकडे आगेकूच करीत आहे दरम्यान माण नदीत पाणी आल्यामुळे वाटंबरे येथील शेतकऱ्यांनी
आ.शहाजीबापू पाटील यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला. यावेळी शेतकऱ्यांसह शिंदे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून खणा नारळाची ओटी पाण्यात सोडून जल पूजन केले.याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे
,प्रा. संजय देशमुख, युवा सेना तालुकाप्रमुख दिपक ऊर्फ गुंडा खटकाळे, माणगंगा सह सा. का.संचालक दादासाहेब वाघमोडे, पांडुरंग मिसाळ, दीपक दिघे, सचिन शिंदे, धीरज पवार सुबराव पवार, खंडू पवार, तातोबा येलपले, दत्तात्रय मासाळ यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments