Breaking News

सांगोला महिला शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न...

 सांगोला महिला शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या  घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे  बक्षीस वितरण उत्साहात संपन्न...


शिवानी कांबळे यांनी पटकाविला प्रथम क्रमांक, स्पर्धेतील सहभागी  महिलांना आकर्षक साडी भेट

सांगोला प्रतिनिधी, शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क (सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला महिला शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने व विधानसभा महिला सांगोला मतदार संघाचे अध्यक्ष सौ.सुचिताकाकी मस्के यांच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या  घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे  बक्षीस वितरण समारंभ गुरूवार दि. 19  रोजी सायं 6 वाजता उत्साही वातावरणात संपन्न झाला.   

सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कु.कृष्णाई दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या शुभहस्ते आणि कु.सुष्टी खरात यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रास्ताविक संगीता पाखरे यांनी केले. 

प्रारंभी कु.कृष्णाई साळुंखे-पाटील यांचा सत्कार सौ.सुचीताकाकी मस्के, कु.सृष्टी खरात यांचा सत्कार सौ.स्वाती प्रताप मस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष तानाजीकाका पाटील यांचा सत्कार उद्योगपती दिलीपकाका मस्के यांच्या हस्ते करण्यात आला.

स्पर्धेत शिवानी विनय कांबळे यांनी प्रथम क्रमांकाचे  रू.11601, रेश्मा प्रशांत दिवटे यांनी व्दितीय क्रमांकाचे  8601 रू, शुभांगी संजय पतंगे यांनी तृतीय क्रमांकाचे 6601 रू. व सौ. शिल्पा सतिश वाघ यांनी उत्तेजनार्थ क्रमांकाचे 3601 रुपयाचे पारितोषिके पटकावले.

 यावेळी ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या जीवन कार्याचा गौरी सजावटी द्वारे संदेश देणाऱ्या मीनाक्षी वेळापुरे यांना 2601 रू.देऊन सन्मानित करण्यात आले.

सर्व विजेत्या स्पर्धकांना ह.भ.प.स्व.शारदादेवी साळुंखे-पाटील यांच्या स्मरणार्थ स्मृतीचषक देण्यात आली. स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना आकर्षक साडी भेट वस्तू देण्यात आली. 

सदरची सर्व बक्षिसे कै.रामचंद्र आबा मस्के आणि कै.सीताबाई रामचंद्र मस्के यांच्या स्मरणार्थ श्री.दिलीपकाका मस्के यांच्यावतीने देण्यात आली आहेत.

यावेळी स्पर्धेत 67 महिलांनी सहभाग नोंदविला होता. सूत्रसंचालन पल्लवी थोरात मॅडम यांनी केले.आभार सौ. सुचिताकाकी मस्के यांनी मानले.

Post a Comment

0 Comments