राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने
सांगोला तालुक्यातील सिद्धेश्वर हिप्परकर सन्मानित
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी): राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचलित विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दरवर्षी राज्यातून शिक्षकांना दिला जाणारा प्रतिष्ठेचाआदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच
सिद्धेश्वर दुर्गाप्पा हिप्परकर यांना राष्ट्रीय अध्यक्ष मा.संतोष निकम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. बापूसाहेब अडसूळ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष प्रा.डॉ.दत्तात्रय काळेल सोलापूर जिल्हा परिषदेचे
शिक्षण अधिकारी मा. महारुद्र नाळे विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूरचे मा.अभिजीत आबा पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.मनीष अण्णा काळजे व डॉ.कपील दादा कोरके यांच्या हस्ते प्राप्त झाला आहे.
सिद्धेश्वर हिप्परकर यांनी अतिशय गरीबीतून शिक्षण घेऊन शिक्षणाचे व्रत सेवाभावी वृत्तीने जपत आहेत. सध्या ते लक्ष्मी नगर ता. सांगोला येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत आहेत.
या त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. शैक्षणिक क्षेत्रातून व ग्रामीण भागातून त्यांचे विशेष असे कौतुक होत आहे.
0 Comments