सांगोला शहरासह इतर ग्रामीण भागामध्ये विजेचा लपंडाव सुरू....
सांगोला प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज) :-
सांगोला शहरासह इतर ग्रामीण गाव खेड्यामध्ये लाईट सारखीच ये-जा करत असते. गणेश उत्सव काळामध्ये गणपतीची आरती करण्यासाठी अथवा रात्रीच्या वेळेस लाईट अजिबात स्थिर राहत नसते.
यामुळे शहराबरोबर ग्रामीण भागामधील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.तरी महावितरण प्रशासनाने गणेश उत्सव कालखंड समाप्त होईपर्यंत विज कायमस्वरूपी सुरू
ठेवावी अशी मागणी शहरी व ग्रामीण भागामधून जोर धरू लागली आहे.तरी संबंधित विभागाने याबाबत तात्काळ दखल घेवून तातडीने उपाययोजना करावी. सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही
अशी भूमिका घ्यावी.महावितरण कंपनीने सुरू असलेल्या गणेशोत्सव सणाला सहकार्य करावे.गणपतीच्या आरती साठी सकाळी व संध्याकाळी लाईट कायम स्वरुपी राहवी अशी मागणी सर्व गणेश भक्तामधून होत आहे.
0 Comments