सोलापूर जिल्ह्यातील घटना.... तिघेजण जेलमधून सुटले, तरी ५ तालुक्यात १५ घरे फोडली!
बंद घरांवर वॉच ठेवून तोडायचे कटावणीने कुलूप; २४ घरफोड्यातील १६ लाखांचे दागिने हस्तगत
सोलापूर : गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील चंद्रकांत मधूकर चव्हाण याच्यासह त्याच्या दोन साथीदारांनी मिळून मंगळवेढा, पंढरपूर शहर-ग्रामीण, सांगोला, टेंभुर्णी, माळशिरस व इंदापूर येथे तब्बल १५ घरफोड्या केल्या.
विशेष म्हणजे चंद्रकांत चव्हाण हा २०२१मध्ये तर इतर दोघे जानेवारी २०२३मध्ये तुरुंगातून बाहेर आले होते. तरीदेखील त्यांनी चोरीचा सिलसिला सुरुच ठेवला.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन पथकांनी २४ घरफोड्या व दोन चोरीचे गुन्हे उघड करीत पाच जणांना अटक केली, तर साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या
मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली आहे. बंद घरे हेरून संशयित आरोपी त्याठिकाणी डाव टाकायचे. दरवाजाचे कुलूप कसलेही असले
तरी कटावणीने ते तोडून घरात प्रवेश करून काही मिनिटात चोरी करून पसार व्हायचे. पण, गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिस पथकांनी संशतियांना जेरबंद केले. विशेष बाब म्हणजे चोरीला गेलेले सोन्या-चांदीचे दागिने पूर्णपणे पोलिसांनी हस्तगत केल्याची
माहिती पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली. सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्या नेतृत्वाखालील पोलिस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, सहायक फौजदार नारायण गोलेकर, मोहन मनसावले, धनाजी गाडे,
धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, यश देवकते, समीर शेख यांच्या पथकाने पाच लाख ३३ हजार १०० रुपयांच्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणून संशयित आरोपी भारत पोपट साठे (रा. बोरगाव, ता. बार्शी) याला जेरबंद केले.
दुसरीकडे पोलिस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक बिराजी पारेकर, सहायक फौजदार शिवाजी घोळवे, पोलिस हवालदार प्रकाश कारटकर, रवी मने, अजय वाघमारे, सूरज रामगुंडे, अन्वर अत्तर व प्रमोद माने यांच्या पथकाने
पंढरपूर शहर व ग्रामीणमधील नऊ घरफोड्या उघडकीस करून सूरज पवार, आकाश बंदपट्टे, अनिल भगतसिंग यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून एक लाख ९१ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बंद घरे टार्गेट; गुन्ह्यातील दुचाकीही चोरीचीच
गोपाळपूर येथील चंद्रकांत चव्हाण याच्यासह दोन जोडीदारांनी टेंभुर्णी (माढा) यासह जिल्ह्यात ठिकठिकाणी ३० गुन्हे दाखल आहेत.
त्यात तिघांना तुरुंगवासही झाला. तरीपण त्यांनी चोरी करायचे सोडले नाही. काही महिन्यांत त्यांनी १५ घरफोड्या केल्या होत्या.
विशेष म्हणजे चोरी करायला हे तिघे ज्या दुचाकीवरून जायचे ते वाहन त्यांनी इंदापूर येथून चोरले आहे. सहायक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या नेतृत्वाखालील सहायक फौजदार ख्वाजा मुजावर,
श्रीकांत गायकवाड, नीलकंठ जाधवर, पोलिस हवालदार परशुराम शिंदे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, हरिदास पांढरे, विनायक घोरपडे, समर्थ गाजरे, दिलीप थोरात यांच्या पथकाने हे गुन्हे उघड केले. दोन शयितांचा शोध सुरु आहे.
0 Comments