धक्कादायक घटना....सांगोला- वाटंबरे रस्त्यावर मध्यरात्री थरार पुण्यातील गँगने पिस्तुलाचा धाक दाखवून सोन्याची चेन काढून घेतली
सांगोला पुणे येथून कारमधून आलेल्या सहा जणांच्या गंगने मिळून हातात कोयते दांडगे घेऊन रोडवर कार अडवून एकावर पिस्तूल रोखून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली
व त्याच्या गळ्यातील ३ तोळे सोन्याची चेन काढून कारमधून धूम ठोकली. हा थरार गुरुवार, २१ रोजी मध्यरात्री १ च्या सुमारास सांगोला ते वाटबरे रोडवरील गणपती मंदिराच्या जवळ घडला.
सहायक पोलिस निरीक्षक स्वीकुमार राजुलवार सह पोलिसांनी वाटंबरे से मंगळवेढा इंचगाव टोल नाक्यापर्यंत सिनेस्टाइलने कारचा पाठलाग करून चौघांना पकडले, तर दोघे जण पळून गेले.
याबाबत अक्षय दत्तात्रय पवार (रा. वाटंबरे, ता.सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे. माउली ऊर्फ ज्ञानेश्वर सुबराव पवार (वय २४, रा. वाटंबरे, ता सांगोला),
संदेश लाजरस चोपडे (वय ३२, रा. काळेवाडी, पिंपरी चिंचवड, पुणे). प्रतीक अशोक माने (वय १९ रा. नळदुर्ग माणेवाडी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), दिगंबर अप्पाराव भोसले (वय १९, रा. मोरतळवाडी,
पोस्ट नळगीर, ता. उदगीर, जि. लातूर), गणेश पोपट घालमे (वय 33 रा. सुद्रीक बरडगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) व चालक आदित्य अहिरराव (वय ३०, रा. काळेवाडी, पिंपरी चिंचवड, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
फिर्यादी अक्षय पवार व त्याचा मित्र मोन्या ऊर्फ संदीप खटकाळे असे दोघे जण एम एच १० ए डब्ल्यू२८२९ या कारमधून सांगोला से वाटंबरे जात होते. त्यावेळी दोघे जण वाटंबरे विजखाली बोलत थांबले
असता त्यांच्या कारसमोर लाल रंगाची तुटलेल्या नंबर प्लेटची कार येऊन थांबली. यावेळी माउलीने त्याच्या कमरेला लावलेले पिस्तूल काढून अक्षयच्या डोक्याला लावली. दुसऱ्या एकाने त्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यावेळी माउलीने त्याच्या कारची चावी काढून ती रस्त्यावर आपटून फोडून टाकली. या झटापटीत गळ्यातील 3 तोळे सोन्याची चेन काढून घेतली व सोबत आलेल्या मोन्याला मारहाण करून मोबाइल फोडून तिथून त्यांना हाकलून दिले, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
0 Comments