google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील बातम्या..धक्कादायक प्रकार...सांगोल्यात तणावामध्ये विष पिऊन महिलेचा मृत्यू सांगोला संकरित गाईंचा मृत्यू

Breaking News

सांगोला तालुक्यातील बातम्या..धक्कादायक प्रकार...सांगोल्यात तणावामध्ये विष पिऊन महिलेचा मृत्यू सांगोला संकरित गाईंचा मृत्यू

सांगोला तालुक्यातील बातम्या..धक्कादायक प्रकार...


सांगोल्यात तणावामध्ये विष पिऊन महिलेचा मृत्यू सांगोला संकरित गाईंचा मृत्यू

तसेच कुत्र्याला वाचविताना अपघात; उदनवाडी येथे १ जणांचा मृत्यू ,शॉक लागून वाटंबरे येथे १ जणांचा मृत्यू

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे )

झाल्यानंतर तणावामध्ये येऊन विषारी औषध प्राशन केल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवारी, दि. २० रोजी कडलास (ता, सांगोला) येथे घडली. 

वर्षा सचिन लेंडवे (वय २८) असे विषारी औषध प्राशनाने मयत झालेल्या महिलेचे नाव आहेयाबाबत अजित बबन जाधव (रा. सिद्धेवाडी, ता. पंढरपूर) यांनी पोलिसात खबर दिली आहे. 

सचिन लेंडवे यांच्या तीन संकरित गाई अचानक मयत झाल्या होत्या. त्यामुळे पत्नी वर्षा या तणावात होत्या. सचिन लेंडवे यांनी मेहुणे अजित जाधव यांना तुम्ही घरी येऊन तिची समजूत काढा व तिला दोन- चार दिवसाकरिता माहेरी घेऊन जावा.असे म्हणाले होते. 

त्यावेळी अजित यांनी बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास बहिणीच्या घरी कडलास येथे येऊन दोघांनी तिची समजूतही काढली होती; परंतु सायंकाळी ५:३० च्या सुमारास वर्षा लेंडवे यांनी विषारी औषध प्राशन केल्यामुळे सांगोला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 सांगोला तालुक्यातील  ठळक बातम्या...

कुत्र्याला वाचविताना अपघात; उदनवाडी येथे १ जणांचा मृत्यू

सांगोला (प्रतिनिधी) :- कुत्र्याला वाचविणेचा प्रयत्नात गाडीचे चाक डिव्हाडरला धडकल्याने झालेल्या अपघातात १ जणांचा मृत्यू तर ४ जण जखमी झाली असल्याची घटना सांगोला तालुक्यातील उदनवाडी गावानजीक असणाऱ्या पुलाजवळ १५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

अपघातामध्ये गाडीचालक सतिश येळे यांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची फिर्याद गणेश येळे यांनी दिली असून पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत.

शॉक लागून वाटंबरे येथे १ जणांचा मृत्यू

सांगोला (प्रतिनिधी):- मोटार चालु करण्यासाठी गेल्यावर इलेक्ट्रीक शॉक लागून १ जणांचा मृत्यू झाला असल्याची घटना काल गुरुवार दि. २१ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजणेचे सुमारास वाटंबरे ता. सांगोला येथे घडली. दगडु पवार रा. वाटंबरे असे दुदैवी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेची फिर्याद शंकर पवार यांनी दिली असून पुढील तपास पोहेकॉ. कोष्टी हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments