हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे आणि ए. राजा यांच्यावर कठोर कारवाई करा !
सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे )
सांगोला - सनातन धर्माविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि धार्मिक भावना दुखवणारे वक्तव्य करणारे तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे आणि द्रमुखचे खासदार ए राजा यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून
त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी हलाल प्रमाणपत्र व्यवस्था तात्काळ बंद करण्याविषयी आणि असे प्रमाणपत्र देणाऱ्या सर्व संस्थांची चौकशी करावी या मागणीचे निवेदन
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगोला येथे तहसीलदार यांना देण्यात आले तहसीलदार यांच्यावतीने नायब तहसीलदार किशोर बडवे यांनी निवेदन स्वीकारले व तात्काळ पुढे पाठवत असल्याचे सांगितले. निवेदन देतेवेळी नवनाथ कावळे,
बाळासो गोसडे, हरिप्रसाद पतंगे, गणपत पटेल, कैलास राणावत, विकास गावडे, प्रशांत राजमाने, संतोष पाटणे सर आदी धर्मप्रेमी उपस्थित होते. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, विश्वबंधुत्वाची शिकवण देऊन सर्वांना सामावून घेणार्या ‘सनातन धर्मा’ची डेंग्यू, मलेरिया,
कोरोना, एड्स आणि कुष्ठरोग आदी रोगांशी तुलना करून ‘सनातन धर्मा’ला नष्ट करण्याची भाषा करणारे तामिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे आणि तामिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी देशभरातील कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
ते सर्वजण आपल्या वक्तव्यांवर ठाम आहेत. त्यामुळे देशभरात हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 153(A), 153(B), 295(A), 298, 505 आणि ‘आय.टी. ॲक्ट’ अंतर्गत गुन्हे तात्काळ दाखल करावेत,
या सर्वांवर ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA)’ लावावा आणि त्यांना अटक करावी, तसेच १५ टक्के मुसलमानांसाठी उर्वरित ८५ टक्के समाजावर हलालची सक्ती केली जात आहे. ‘हलाल प्रमाणिकरणा’तून मिळालेल्या पैशांचा वापर आतंकवाद्यांना कायदेशीर साहाय्य देण्यासाठी केला जात आहे.
त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ‘हलाल अर्थव्यवस्था’ एक मोठे संकट बनले आहे. नुकतेच भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने ‘जमियत उलेमा ए हिंद’ या संघटनेला अधिकृतपणे ‘हलाल सर्टिफिकेशन’ची मान्यता देणारे नोटिफिकेशन जारी केले आहे.
जर हे लागू झाले, तर आता चालू असलेली अघोषित हलाल सक्ती अधिकृत होईल. या विरोधात हिंदु जनजागृती समिती ‘हलाल मुक्त भारत’ अभियानाअंतर्गत ‘हलालमुक्त गणेशोत्सव’ हे अभियानही राबवत आहे.
0 Comments