google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 रिपब्लिकन सामाजिक संघटनेची स्थापना गाव तिथे शाखा सुरू करून आंबेडकरी चळवळ गतिमान करणार : मा. नगरसेवक सुरजदादा बनसोडे

Breaking News

रिपब्लिकन सामाजिक संघटनेची स्थापना गाव तिथे शाखा सुरू करून आंबेडकरी चळवळ गतिमान करणार : मा. नगरसेवक सुरजदादा बनसोडे

 


 रिपब्लिकन सामाजिक संघटनेची स्थापना गाव तिथे शाखा सुरू करून


आंबेडकरी चळवळ गतिमान करणार : मा. नगरसेवक सुरजदादा बनसोडे

सांगोला/ (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे)

काल दि. 12 सप्टेंबर रोजी मा. नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये सांगोला तालुक्यातील आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे व गेली कित्येक वर्ष माझ्याबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली.

या बैठकीमध्ये रिपब्लिकन सामाजिक संघटना या आंबेडकरी चळवळीवर काम करणाऱ्या संघटनेची स्थापना करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा राजकीय पक्ष स्थापन केला होता.

 परंतु तो राजकीय पक्ष काही वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय पक्षांना मदत करत आहे. त्यांच्या अशा ध्येयधोरणावर महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील आंबेडकरी समाज हा प्रचंड नाराज असून, त्या नाराजीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्याला सामोरे जावे लागत आहे. 

म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला विरोध करणाऱ्या व धर्मांध राजकीय पक्षांना विरोध करण्यासाठी सांगोला तालुक्यामध्ये रिपब्लिकन सामाजिक संघटना स्थापन करण्यात आली आहे.

 या संघटनेच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ व सामाजिक कार्य करून वेळप्रसंगी राजकारणामध्ये येणाऱ्या निवडणुकीत धर्मांध व जातीवादी मनोप्रवृत्तीच्या राजकीय पक्षाला विरोध करण्याचे काम करण्यात येईल.

 या बैठकीमध्ये तालुक्यातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला. वास्तविक पाहता सांगोला तालुक्यामध्ये तसेच सबंध महाराष्ट्र मध्ये दलित समाज इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपल्या राजकीय सोयीसाठी दलित समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न चालू आहे.

 ही संघटना अशा प्रवृत्तींना ठेचून काढून, दलित ऐक्य करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. काही आंबेडकरी चळवळीतले स्वयंघोषित नेते व पदाधिकारी समाजावर झालेला अन्याय किंवा आंबेडकरी चळवळीवर झालेला आघात या विषयावर कधी मोर्चे किंवा आंदोलने न करता फक्त राजकीय पदे सांगण्यात मग्न आहेत.

 अशा स्वार्थी राजकीय नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची दुकानदारी लवकरच बंद पडणार आहे. असे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांनी सांगितले आहे. या बैठकीचे प्रास्ताविक पोपट तोरणे यांनी केले. 

तर कडलास ग्रामपंचायतिचे सरपंच दिगंबर भजनावळे तसेच ग्रा.प.सदस्य कमलापूर पप्पू ऐवळे, तसेच स्वप्निल सावंत, दीपक होवाळ, विनायक गंगणे, चंदू मोरे, अमोल कांबळे, गुळिग गौडवाडी, माणिक सकट, संकेत ठोकळे, शंकर लांडगे, नितीन रणदिवे, अरुण (अण्णा) बनसोडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

 यावेळी सुनील (लकी) कांबळे, गुणवंत जगधने, लखन माने, चंद्रकांत काटे,  विशाल गुळिग, प्रवीण पगारे, हानी कांबळे, सचिन होवाळ, किरण बनसोडे, देवराज बनसोडे, केतन शेळके, किशोर झेंडे, निखिल गडहिरे, लखन सोनवले, दुर्योधन सूर्यगंध, काशिनाथ बनसोडे, सुजित बनसोडे, 

शंकर होवाळ, बाबासो चंदनशिवे, राकेश सोहनी, अजय ऐवळे, अण्णा ऐवळे, आबासाहेब ऐवळे, रोहित गेजगे, बाळासाहेब भजनावळे, दाजी ऐवळे, चंद्रशेखर बनसोडे, नवनाथ गुळिग, रोहित चंदनशिवे, विशाल हातेकर, आबासो गुळिग, ऋतिक होवाळ, सागर उबाळे, 

सिद्धार्थ उबाळे, समाधान जावीर, अविनाश वाघमारे, आकाश काटे, प्रशांत कांबळे, सुरज उबाळे, सचिन गेजगे, राजेश कांबळे, आदित्य तोरणे, आदित्य चंदनशिवे, शकील सावंत, अनिल ठोकळे, पोपट जगदाळे, बबलू जगधने, भीमराव बनसोडे, शंकर लांडगे, संभाजी लांडगे, निशांत लांडगे, शिवाजी लांडगे, बापू सरवदे, 

ऋषिकेश ठोकळे, तुषार ठोकळे, नाना सोनवले, रोहित बनसोडे, आनंद मागाडे, बिरा लांडगे, अर्जुन लांडगे, अविनाश बनसोडे, केतन शेळके, समाधान होवाळ ग्रामपंचायत सदस्य वाकी शिवणे आदी तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम अजित होवाळ यांनी केला.

Post a Comment

0 Comments