google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्हा शिक्षण विभागात उडाली खळबळ....वादग्रस्त माध्यमिक शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांना कारणे दाखवा नोटीस

Breaking News

सोलापूर जिल्हा शिक्षण विभागात उडाली खळबळ....वादग्रस्त माध्यमिक शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांना कारणे दाखवा नोटीस

 सोलापूर जिल्हा शिक्षण विभागात उडाली खळबळ....


वादग्रस्त माध्यमिक शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांना कारणे दाखवा नोटीस

सोलापूर प्रतिनिधी, (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे )

पंढरपूर येथील तत्कालीन शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे हे कायमच वादग्रस्त राहिले असून यावेळी त्यांच्या विरोधात अनेक वेळा शिक्षण विभागातील अधिकारी आणि शिक्षक संघटनांनी त्यांच्या कामाला विरोध केला होता 

म्हणून त्यांचे वादग्रस्त भूमिका राहिली होती आता देखील त्यांच्यावर सोलापूर येथील शिक्षण विभागातून शालार्थ आयडी प्रकरणातून वादग्रस्त असल्याची भूमिका जाहीर झाली आहे.

20 टक्के टप्पा अनुदानाच्या शालार्थ आयडीची प्रस्ताव पुणे उपसंचालक शिक्षण विभागाकडे कोणताही संपर्क न साधता परस्पर पाठवल्याप्रकरणी शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी

 सोलापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांना चांगलेच फटकारले असून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. या नोटीसद्वारे आपणास कळविण्यात येते की, शासन निर्णय दि.०६.०२.२०२३ नुसार २० टक्के अनुदानास पात्र कर्मचा-यांना शालार्थ आय डी देणेबाबतचे प्रस्ताव 

आपल्या स्तरावर शिबीराचे आयोजन करुन या कार्यालयाकडील तपासणीसुचीनुसार तपासणी करुन आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह तसेच शिफारशीसह या कार्यालयास सादर करणेबाबत कळविण्यात आले होते,

परंतु सदरचे प्रस्ताव आपण या कार्यालयातील शालार्थ कामकाज पाहणारे अधिकारी किंवा कर्मचारी यांचे संपर्क न साधता परस्पर सादर केलेले आहे, तसेच सदरचे प्रस्ताव या कार्यालयातील आवक-जायक शाखेत आवक नोंद न करता मोघमपणे माध्यमिक शाखेत ठेवुन दिले आहेत, ही बाब प्रशासकीय दृष्ट्या योग्य नाही, 

या कार्यालयाव्दारे आपणास वारंवार शालार्थ आय-डी प्रकरणांबाबत गांभीर्याने लक्ष देऊन प्रस्ताय वैयक्तिकरित्या तपासणी करुन आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शिफारशीसह सादर करणे आवश्यक

 असताना आपण जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहात हे दिसून येते, हे आपले कृत्य वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचा अवमान करणारे सकृतदर्शनी दिसून येते. सदर प्रकरणांबाबत मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे हे बारंबार आढावा घेत

 असून सोलापूर जिल्हयामधील कामकाजाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, कर्मचा-यांचे शालार्थ आय डी बाबतची परिपूर्ण सर्व प्रकरणे आपण या कार्यालयास सादर न केल्यामुळे उक्त नमूद निर्देशानुसार सदर प्रकरणी विहित मुदतीत कार्यवाही का करण्यात आली नाही ?

 याबाबतचा लेखी खुलासा समक्ष माझ्या समोर २ दिवसात सादर करण्यात यावा. सदर खुलासा विहित वेळेत प्राप्त न झाल्यास व असमाधानकारक असल्यास पुढील कारवाई अनुसरण्यात येईल याची गाभियर्याने नोंद घेण्यात यावी.

Post a Comment

0 Comments