google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..पंढरपूर महावितरण विभागाला "ACB" ने दिला "करंट" 5000 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Breaking News

मोठी बातमी..पंढरपूर महावितरण विभागाला "ACB" ने दिला "करंट" 5000 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

मोठी बातमी..पंढरपूर महावितरण विभागाला "ACB" ने दिला "करंट"


5000 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

संबंध देशात तसेच राज्यात भ्रष्टाचाराने हाहाकार माजवला असून विविध विभागांमधिल शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी हे सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून त्यांच्याकडे पैशांची मागणी

 करत असल्याचे अनेक प्रकार घडत आहेत परंतु त्यापैकी अगदी थोडेफार सगज नागरिक समोर येऊन संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करत असल्याचे दिसून येत आहे 

आज असाच एक प्रकार पंढरपूरमध्ये घडला असून महावितरण कंपनीकडील श्रीकांत आव्हाड वय वर्ष 38 या सहाय्यक लेखपाल कर्मचाऱ्याने यातील  तक्रारदार यांचे किराणा दुकान असून त्यांनी दुकानाकरिता शेजारून लाईट घेतली म्हणून त्यांना 70,00हजार रुपयांचा दंड आकारला होता  

तो दंड माफ करण्याकरता आवाड या महावितरणच्या कर्मचाऱ्याने तक्रारदाराकडे 15 हजार रुपयांची लाच मागितली होती त्यापैकी पाच हजार रुपयांची लाच घेताना त्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे या संबंधी पंढरपूर पोलीस स्टेशन येथे त्याच्यावर गुन्हा दाखल केला गेल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत समजलेले अधिक माहिती अशी यातील तक्रारदार यांचे किराणा मालाचे दुकान आहे. नमूद दुकानांमध्ये नवीन वीज मीटर घेण्याकरिता तसेच तक्रारदार यांनी शेजारच्या दुकानातून लाईट कनेक्शन घेतले म्हणून त्याच्यावर ७०,०००/रू चा दंड आकारलेला आहे असे सांगून तो दंड माफ करण्याकरिता यातील 

आरोपी लोकसेवक श्रीकांत भिमराव आवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे सुरुवातीस पंधरा हजार रुपयाची मागणी करून तडजोडी अंती पाच हजार रुपयाची लाचेची मागणी करून पाच हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे कबूल करून

, ती लाच रक्कम महावितरण कार्यालय पंढरपूर ग्रामीण-२ या कार्यालयाच्या आवारात स्वीकारले असता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. याबाबत पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

या सापळा पथकामध्ये पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे,पो.शि. रियाज शेख, पो.शि. दिनेश माने,पो. शि मंगेश कांबळे चालक पो.हवा दिवेकर, ला.प्र.वि. पुणे. यांनी पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र अमोल तांबे, व अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे श्रीमती शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी ,कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments