मोठी बातमी! देवदर्शन करून परत येत असताना गाडीचा अपघात;
मंगळवेढ्यातील तरुण ठार तर कुटुंबातील पाच जण जखमी सांगोला तालुक्यातील घटना...
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे )
सांगोला- मिरज महामार्गावरील उदनवाडी (ता. सांगोला) येथे शुक्रवारी साधारण मध्य रात्री कारने डिव्हायडरला जोराची धडक दिली. त्यात कारमधील एक ठार झाला. तर पाच जण जखमी झाले.
जखमींवर सांगोला येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सतीश शिवाजी येळे (वय ३८, कागस्ट, ता. मंगळवेढा) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आदमापूर येथून बाळूमामाचे दर्शन घेऊन मंगळवेढ्याच्या दिशेने येत असताना उदनवाडी (ता. सांगोला) येथे डिव्हायडरला गाडीने जोराची धडक दिल्याने सतीश येळे या तरुणाचा मृत्यू झाला आहे.


0 Comments