सांगोला तालुक्यातील सावे नंतर बुद्धेहाळ येथे निष्ठावंत कार्यकर्त्याची दुसरी बैठक संपन्न: जयंत पाटील यांच्या अंतिम बैठकीनंतर शेकापमध्ये होणार मोठा राजकीय भूकंप
सांगोला / प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे
५० हून अधिक वर्ष सांगोला तालुक्यात सत्तेत असणारा पक्ष अशी ओळख असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला प्रभावी आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची कमतरता जाणवू लागली आहे. सध्या सांगोला तालुक्यात पक्षाचे नेतृत्व करत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पक्षात सुरू असलेली मनमानी न थांबवल्यास
आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना विचारात न घेतल्यास तालुक्यात प्रभावी असलेल्या शेतकरी कामगार पक्षामध्ये उभी फुट अटळ आहे असा निर्धार पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
गेल्या काही महिन्यापूर्वी पक्षात निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतले जात नसल्याने तसेच निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय होत असल्याने सावे येथे शेकापच्या अनेक दिग्गज नेत्यांनी बैठक घेऊन आपला असंतोष व्यक्त केला होता.
या बैठकीत नंतर ही यावर तोडगा न निघाल्याने नुकतीच बुद्धेहाळ येथे पुन्हा एकदा व्यापक बैठक घेऊन निष्ठावंत कार्यकत्यांनी पक्ष नेतृत्वाच्या विरोधात एल्गारजातीयवाद करून सत्ता मिळवता येणार नाही..!!
स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांनी शेवटच्या श्वासापर्यंत पुरोगामी विचार जपत समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन न्याय देण्याची भूमिका घेतली त्यामुळेच समाजातील सर्व जाती-धर्माचे लोक त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत होते
परंतु सध्याचे शेकाप नेतृत्व विशिष्ट जातीच्या लोकांनाच सोबत घेऊन तालुक्याची सत्ता मिळवण्याची स्वप्ने पाहत आहे मात्र जातीयवाद करून सत्ता मिळवता येणार नाही असा सूर या बैठकीतून पुढे येत होता.
पुकारला आहे. बुद्धेहाळ येथील बैठकीस शेतकरी कामगार पक्षाच्या चिटणीस मंडळाचे सदस्य ज्येष्ठ नेते बाबा कारंडे माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख माजी सभापती बाळासाहेब काटकर उपसभापती संतोष देवकते उल्हास धायगुडे हनमंतमाणगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीत पक्षाची बदनामी
स्व गणपतराव देशमुख यांनी हयातभर आपल्या कार्यकर्तुत्वाने एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे त्यांच्या शब्दाला आणि पक्षाला एक वेगळे वजन होते परंतु सध्याचे नेतृत्व ही ओळख जपण्यात कमी पडत आहेत. अनेक वर्षे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्या सोबतची आघाडी शेकापने प्रामाणिकपने निभावली होती
मात्र नुकत्याच झालेल्या माणगंगा सहकारी साखर कारखाना लि आटपाडी सांगोला या कारखान्याच्या निवडणुकीत पक्षाचे नेत्यांनी घेतलेल्या संदिग्ध भूमिकेमुळे संपूर्ण सांगोला आणि आटपाडी तालुक्यात प्रचंड बदनामी झाली असल्याची तक्रार चिटणीस मंडळाचे सदस्य बाबा कारंडे यांनी केली.
कोळवले पोपट गडदे प्रशांत वलेकरआदींसह सांगोला तालुक्यातील ३९ गावातील प्रमुख उपस्थित होते.
सध्या सांगोला तालुक्यात पक्ष नेतृत्वाने सुरू केलेली मनमानी पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या कानावर घातली आहे. याबाबत निष्ठावंत शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते व जयंत पाटील यांच्यात दोन ऑगस्ट रोजी सोलापूर येथे तब्बल दोन ते तीन तास सविस्तर चर्चा झाली असल्याचे या बैठकीतून समोर आले आहे पक्ष नेतृत्वाकडे जर निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसेल
तर आता थांबून प चालणार नाही असा निर्धारच बुद्धेहाळ येथील बैठकीत व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केला शेकापचे राज्याचे नेते जयंत पाटील यांच्यासोबत अंतिम बैठक घेऊन सांगोला तालुक्यात मोठा राजकीय भूकंप घडविण्याच्या हालचाली शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी सुरू केल्या आहेत.
सध्या शेतकरी कामगार पक्षांमध्ये डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या भोवती चांडाळ चौकडीचा प्रभाव वाढला आहे. प्रत्येक निर्णयात हस्तक्षेप करून शेतकरी कामगार पक्ष वाढवण्यासाठी ज्यांनी जीवाचे रान आणि रक्ताचे पाणी केले त्यांनाच बाहेर काढण्यासाठी ही चांडाळ चौकड़ी सक्रियअसल्याचा घनाघाती आरोप या बैठकीत निष्ठा कार्यकर्त्यांनी केला.
सहकारी संस्थांच्या संचालक मंड तसेच चेअरमन व्हाईस चेअरमन यांची निवड करतान कार्यकर्त्यांना अजिबात विश्वासात घेतले जात नाही डॉ .बाबासाहेब देशमुख मनमानी पद्धतीने शेतकरी कामगार पक्ष चालवत आहेत त्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे पक्षा अतोनात नुकसान होत आहे
स्वर्गीय भाई गणपतरा देशमुख यांनी शेवटच्या श्वासापर्यंत कधीही पक्षान एकाधिकारशाही येऊ दिली नाही प्रत्येक निर्णय घेताना लोकशाही पद्धतीने निष्ठावंत कार्यकत्यांना विचारत आ विश्वासात घेत होते त्यामुळेच पक्षाने ५० ते ६० वर्षे सांगोला तालुक्यात सत्ता गाजवली.
आज डॉ. बाबासाहेब देशमुख स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या विचारांना तिलांजली देऊन स्वतःला त्यांचे वारसदार म्हणत असतील तर नक्कीच स्व आबासाहेबांना अपेक्षित नव्हते अशी खंत है यावेळी कार्यकत्यांनी व्यक्त केली.
या बैठकीत पोपट गडदे प्रशांत बलेकर संतोष देवकते सचिन देशमुख उल्हास धायगुडे बाबासाहेब करांडे आदी मनोगत व्यक्त करत विद्यमान शेकाप नेतृत्वावर निशाणा साधला


0 Comments