google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मूक बधिर निवासी शाळा सांगोला येथे गणपती विसर्जन व दिव्यांग पालक बैठक संपन्न.

Breaking News

मूक बधिर निवासी शाळा सांगोला येथे गणपती विसर्जन व दिव्यांग पालक बैठक संपन्न.

 मूक बधिर निवासी शाळा सांगोला येथे गणपती विसर्जन व दिव्यांग पालक बैठक संपन्न.


कोळे / वाहिद आतार( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)

जनजागृती प्रबोधन मंच चोपडी संचलित मूकबधिर निवासी शाळा सांगोला या ठिकाणी दि.28.09.2023 रोजी गणपती विसर्जन करण्यात आले व सर्व दिव्यांग विद्यार्थी व जमलेल्या  पालकांना विविध योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले.

प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना सोलापूर  विभागीय जिल्हाध्यक्ष श्री.विजय पुरी व संजीवनी ताई बारंगुळे प्रहार सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष यांच्या हस्ते श्री.गणेश पूजन करून आरती करण्यात आली,

 त्यानंतर प्रहार संघटनेचे सर्व पदाधिकारी दत्ताभाऊ चौगुले,सतीश दीड वाघ,भीमाशंकर लोखंडे,गणेश ननवरे,विद्यामती लोखंडे,बागवान यांच्या हस्ते हेलन केलर व ब्रेल यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून पूजन करण्यात आले 

व त्यानंतर सतीश दीडवाघ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.भीमाशंकर लोखंडे यांनी विविध योजनांची माहिती सांगितली त्याचबरोबर विजय पुरी यांनी सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले.संजीवनीताई बारंगुळे यांनी सर्वांशी संवाद साधला व विविध योजनांची माहिती सांगितली.

मूकबधिर निवासी शाळा सांगोला या शाळेच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम व शाळेतील शिक्षक यांच्या हस्ते प्रहार संघटनेतील मान्यवर व पालकांचा सत्कार करण्यात आला

 व सर्व पाहुण्यांचे आभार मानले सर्व पाहुणे,पालक व विद्यार्थी यांनी समूह भोजनाचा आनंद घेतला.या कार्यक्रमासाठी सांगोला तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी, पालक व शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments