google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..कोण पात्र, कोण अपात्र, सुनावणी १३ ऑक्टोबरला

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..कोण पात्र, कोण अपात्र, सुनावणी १३ ऑक्टोबरला

ब्रेकिंग न्यूज..कोण पात्र, कोण अपात्र, सुनावणी १३ ऑक्टोबरला


आमदार अपात्रतेची टांगती तलवार आता १३  ऑक्टोबरपर्यंत लटकत राहणार आहे. त्यामुळे नोटीस दिलेल्या ५४  आमदारांची चिंता वाढली आहे 

तर दुसरीकडे आमदार अपात्रतेचा निर्णय लांबणीवर जात असल्याने ही प्रक्रिया यावर्षी पूर्ण होण्याची शक्यता मावळल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आमदार अपात्रतेसंदर्भात आज (२५ सप्टेंबर) पहिली सुनावणी होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आजच्या सुनावणीमध्ये वेळापत्रक निश्चित होणार होते. पण प्रकरण एकच असल्यामुळे सर्व याचिका एकत्रित कराव्यात आणि सुनावणी घ्यावी 

अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली. तर या मागणीला शिंदेंच्या शिवसेनेकडून विरोध करण्यात आलाय. दरम्यान, दोन्ही बाजूंचं म्हणणे ऐकल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी करणार असल्याचं स्पष्ट केले आहे

ठाकरे गटाच्या वतीने देवदत्त कामत यांनी आज युक्तिवाद केला. याचिकांचा विषय एकच असल्यामुळे त्यावर एकत्रित सुनावणी घेतल्यास निर्णय घेण्यास वेळ कमी लागेल, असा दावा त्यांनी केला.

 तर शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी आम्हाला स्वतंत्र पुरावे द्यायचे आहेत, अशी भूमिका घेत वेगवेगळ्या सुनावणी घ्या, अशी मागणी लावून धरली.

आता आमदार अपात्रतेवर तब्बल १८  दिवसांनी सुनावणी होणार आहे. आमदार अपात्रेसंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. परंतु, विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीला विलंब होत असल्याचा दावा करत ठाकरे गटाने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

 त्यावर काही दिवसांपूर्वी सुनावणी झाली आणि विधानसभा अध्यक्षांना लवकरात लवकर सुनावणी घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

शिरसाटांनी काय म्हटलं?

विधानसभा अध्यक्षांनी निकाल राखून ठेवलाय, अशी माहिती शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी या सुनावणींनंतर माध्यमांना दिली. आजच्या सुनावणीमध्ये प्रत्येक पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. 

तसेच ही सुनावणी ऑनलाईन व्हावी अशी मागणी होती. त्याबाबत अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केल्याचं, शिरसाटांनी माध्यमांना सांगितलं.

सुनावणी नियमांप्रमाणे – गोगावले

अध्यक्ष नियमाप्रमाणेच निकाल देतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे. आम्ही मेरिटवर असल्यामुळे आम्हाला काळजी करण्याची गरज नाही, 

तर ठाकरे गटांने आजपर्यंत जे भविष्य वर्तवले ते त्यांच्या विरोधात गेल्याचा दावा करत गोगावलेंनी ठाकरे गटावर टीका केली.

Post a Comment

0 Comments