google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आनंदा माने यांनी वाढदिवसादिवशी जन्मलेल्या मुलीच्या नावे ठेवीचा केलेला संकल्प कौतुकास्पद :ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न

Breaking News

आनंदा माने यांनी वाढदिवसादिवशी जन्मलेल्या मुलीच्या नावे ठेवीचा केलेला संकल्प कौतुकास्पद :ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न

 आनंदा माने यांनी वाढदिवसादिवशी जन्मलेल्या मुलीच्या नावे ठेवीचा केलेला संकल्प कौतुकास्पद :ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर


आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न

सांगोला/प्रतिनिधी :( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)


आपण देव नाही पण देवाचा अंश आहे, कीर्तने कमी करून धर्म टिकवायचा आहे, जिथं संपत्ती, दया आहे तिथे देव आहे, जीवनात स्वार्थ, अहंकार वाढला की व्यक्तीचा नाश होतो. 


लक्ष्मीच्या ठाई नम्रता ठेवली नाही तर लक्ष्मी माणसाला संपवते. माणसाच्या जीवनात ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचे ध्यान आहे. सुशिक्षित वाढत गेले आणि वृद्धाश्रमाची संख्या वाढली. वृद्धाश्रमात शेतकरी कुटुंबातील आई वडील नाहीत. 

या ठिकाणी नोकरीवाल्यांचे आई-वडील आहेत. जन्मदात्या आई-वडिलांचा सांभाळ करणं हे आपलं कर्तव्य आहे. जगातील सर्वात मोठी संपत्ती आई-वडील आहेत. आई, वडील, संत, भगवंत आपले आहेत. गरीब माणूस संपत्तीपेक्षा इज्जतीला महत्त्व देतो.

 सांगोल्यातील आनंदाभाऊ माने यांनी वाढदिवसाच्या दिवशी जन्मलेल्या मुलीच्या नावे ठेव ठेवण्याचा केलेला संकल्प म्हणजे मुलीच्या जन्माचे स्वागत असून हा उपक्रम विशेष कौतुकास्पद आहे, असे मौलिक विचार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी सांगोला येथे आनंदा माने यांच्या वाढदिवसादिवशी आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले. 

आनंदभाऊ माने यांच्याकडे विकासाची दुरदृष्टी आहे. वाढदिवसाच्या दिवशी जन्मलेल्या मुलींच्या नावे ठेव ठेवणे, तसेच वृक्षारोपण, रंगभरण स्पर्धा, कीर्तनासारखा धार्मिक कार्यक्रम आयोजित करणे म्हणजे वैचारिक प्रगल्भता पाहिला मिळते. सध्या समाजात वेगवेगळे चित्र पाहायला मिळत आहे.

 भविष्यात माणसाला जमीन विकत मिळणार नाही. प्रत्येक कुटुंब विभक्त होत आहे. सध्या राजकारणाचा व शिक्षणाचा खेळ खंडोबा झाला आहे. मी कीर्तनाच्या माध्यमातून सत्य बोलतो ते अनेकांना पटत नाही. पण सत्य टिकवण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून वास्तवता समोर आणतो आहे, 

असे विचार व्यक्त करीत ह.भ.प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आनंदा माने यांना धन्यवाद देत त्यांचा शंभरावा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य आपल्याला मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करीत आनंदा माने यांना उदंड आयुष्य लाभो व कुटुंबाची भरभराट व्हावी, अशा सदिच्छा दिल्या.

आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त सपत्नीक एकत्रित भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंदाभाऊ माने मित्रपरिवार व अभिष्टचिंतन सोहळा समिती, मित्रपरिवार  यांनी विशेष परिश्रम घेतले. ह.भ.प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद अबालवृद्धांनी घेतला व आनंदाभाऊ माने यांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments