प्रा . उषा कोळवले / मेखले यांची राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्नगौरव सन्मान पुरस्कारासाठी निवड
सांगोला :- द ग्लोबल व्हाईस, ब्लू टायगर सामाजिक संस्था, मुंबई,श्वेतगंध फाउंडेशन, डोंबिवली व परिवार सामाजिक संस्था, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा
यंदाचा महाराष्ट्र रत्नगौरव सन्मान पुरस्कारासाठी सांगोला तालुक्यातील अजनाळे गावची कन्या व चोपडी गावची सून तसेच माणदेश अध्यापक विद्यालयातील प्रा . उषा कोळवले / मेखले यांची निवड करण्यात आली आहे .
प्रा . उषा कोळवले / मेखले यांची शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात करीत असलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे . या पुरस्कारासाठी निवड झाल्याने त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे .
विविध मान्यवरांच्या हस्ते प्रा . उषा कोळवले / मेखले यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे . हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्यावरती शुभेच्छा चा वर्षाव होत आहे .
द ग्लोबल व्हाईस, ब्लू टायगर सामाजिक संस्था, मुंबई,श्वेतगंध फाउंडेशन, डोंबिवली व परिवार सामाजिक संस्था, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्र रत्नगौरव गुणिजन सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या गुणिजन सत्कार सोहळ्यात दिनांक १२ ऑगस्ट २०२३ रोजी या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे . या पुरस्काराची निवड निवड समितीच्या पदाधिकारी यांनी केली आहे . गौरवपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे . पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती मा. डॉ. बी. एन. खरात यांनी दिली आहे.
द ग्लोबल व्हाईस, ब्लू टायगर सामाजिक संस्था, मुंबई,श्वेतगंध फाउंडेशन, डोंबिवली व परिवार सामाजिक संस्था, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या‘महाराष्ट्र रत्नगौरव गुणिजन सत्कार सोहळ्यात सहकार, शिक्षण, प्रशासन, सामाजिक, राजकीय, लोककला, पत्रकार, पत्रकारिता, कृषी या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करून सामाजिक लौकिकात भर घालणार्या व्यक्तीला विविध पुरस्काराने सन्मानित केले जाते .
या वेळी सामाजिक व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणार्या प्रा . उषा कोळवले / मेखले यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आल्याचे निवड पत्राद्वारे कळविण्यात आले आहे .
द ग्लोबल व्हाईस, ब्लू टायगर सामाजिक संस्था, मुंबई,श्वेतगंध फाउंडेशन, डोंबिवली व परिवार सामाजिक संस्था, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘महाराष्ट्र रत्नगौरव गुणिजन सत्कार सोहळा
शनिवार दि. १२ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ०३.३० वा. स्थळ- सहयोग मंदिर हॉल, सहयोग मंदिर पथ, घंटाळी, नौपाडा, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र ४००६०२ या ठिकाणी सुप्रसिध्द अभिनेत्री मा. नयना आपटे यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे .
तसेच या सोहळ्यासाठी मोठ- मोठे मान्यवर उपस्थित राहणार आहेत या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे . व प्रा . उषा कोळवले / मेखले यांच्या उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र रत्नगौरव सन्मान हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे .


0 Comments