google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सचिन चंदनशिवे यांची शिक्षक भारती संघटनेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

Breaking News

सचिन चंदनशिवे यांची शिक्षक भारती संघटनेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

 सचिन चंदनशिवे यांची शिक्षक भारती संघटनेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी नियुक्ती 


सांगोला / (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)

शिक्षक भारती च्या सोलापूर जिल्हा खाजगी प्राथमिक माध्यमिक शिक्षक भारती या संघटनेच्या नुकत्याच पंढरपूर येथे संपन्न झालेल्या सहविचार सभेमध्ये सांगोला तालुका अध्यक्षपदी सचिन चंदनशिवे यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.

शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या न्याय हक्कांसाठी व त्यांचे प्रश्न तात्काळ सोडवण्याच्या हेतूने आमदार कपिल पाटील यांनी स्थापन केलेली शिक्षक भारती संघटना सोलापूर जिल्ह्यामध्ये शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे आणि सहकारी सक्षमपणे कार्य करीत आहेत.

शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अडीअडचणी व समस्या संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे सोडवण्यासाठी व तालुक्यातील शिक्षक शिक्षकेतर यांच्यामध्ये सुसंवाद व एकोपा निर्माण व्हावा यासाठी तालुका निहाय शिक्षक भारतीच्या शाखा कार्यरत आहेत. 

खाजगी प्राथमिक माध्यमिक शिक्षक भारती या संघटनेची नुकतीच पंढरपूर येथे सहविचार सभा संपन्न झाली . या सहविचार सभेमध्ये सांगोला तालुका अध्यक्षपदी जवाहर विद्यालय घेरडी येथे कार्यरत असणारे सचिन तानाजी चंदनशिवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

एक निर्भिड पत्रकार म्हणून ही त्यांची तालुक्यात ओळख आहे. जिल्ह्यातील नामवंत व स्थानिक दैनिकांमधून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न , समस्या, व्यथा,वेदना वर्तमानपत्रांच्या माध्यमातून   निर्भीडपणे मांडून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.

 विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असतात. यावेळी सांगोला तालुका सचिवपदी रयतचे सज्जन मागाडे यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. 

या सहविचार सभेसाठी शिक्षक भारतीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुजितकुमार काटमोरे , उपाध्यक्ष रियाजअहमद अत्तार ,सचिव सुरेश कणमुसे ,प्रकाश अतनूर ,शशिकांत पाटील

 ,राजकुमार देवकते ,शाहू बाबर,शरद पवार अमोल तावसकर , शाम कदम आदी उपस्थित होते. या सहविचार सभेसाठी पंढरपूर व सांगोला तालुक्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments