google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! पदवीत नापास झालेल्यांना पंधरा दिवसात पुन्हा परीक्षा; सोलापूर विद्यापीठाचा निर्णय

Breaking News

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! पदवीत नापास झालेल्यांना पंधरा दिवसात पुन्हा परीक्षा; सोलापूर विद्यापीठाचा निर्णय

 विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! पदवीत नापास झालेल्यांना


पंधरा दिवसात पुन्हा परीक्षा; सोलापूर विद्यापीठाचा निर्णय 

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पदवीच्या अंतिम सत्राच्या सर्व अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालात साधारण १५ ते २० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

आता या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठ प्रशासन करीत आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

पुढील पंधरा दिवसात परीक्षांचे नियोजन होण्याची शक्यता आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांनी विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठ इतिहासात पहिल्यांदाच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. विद्यापीठाच्या पदवी अंतिम वर्षाच्या सर्व अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण व करिअरसाठी उत्तीर्ण होणे फार महत्त्वाचे असते.

पंधरा ते वीस टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षण व करिअरसाठी तातडीने पुरवणी परीक्षा घेण्याचे नियोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून करण्यात येत आहे.

परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय

आता लवकरच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा होईल. परीक्षा मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत या पुरवणी परीक्षा संदर्भात सर्व नियोजन करण्यात येईल. त्यासंदर्भात एक नियमावली तयार करण्यात येईल.

 त्या दृष्टिकोनातून तयारी करून नापास विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेण्यात येईल, असे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments