google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 हादरवणारी घटना... प्रेमात अडसर ठरणाऱ्या चिमुकल्याचा आईने प्रियकरासोबत घोटला गळा, सोलापूर हादरलं

Breaking News

हादरवणारी घटना... प्रेमात अडसर ठरणाऱ्या चिमुकल्याचा आईने प्रियकरासोबत घोटला गळा, सोलापूर हादरलं

हादरवणारी घटना... प्रेमात अडसर ठरणाऱ्या चिमुकल्याचा


आईने प्रियकरासोबत घोटला गळा, सोलापूर हादरलं

सोलापूर, : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं दिसत आहे. अशातच आता सोलापूर जिल्ह्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. 

या घटनेत आईनेच पोटच्या चार वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.प्रेमात अडसर ठरत असल्याने आईने तिच्या प्रियकरासोबत हे धक्कादायक कृत्य केलं आहे. 

माढा तालुक्यातील मोडलिंब येथे ही घटना घडली आहे.प्रेमात अडसर होत असल्याने पोटच्या मुलाचा घोटळा गळासोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मोडलिंब येथे राहणाऱ्या आई आणि तिच्या प्रियकराने प्रेमात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या चुटक्या नावाच्या मुलाचा गळा दाबून खून केला. 

त्यानंतर त्याचा मृतदेह पुरंदर तालुक्यातील माळशिरस जवळील भुलेश्वर घाटात फेकून दिला. आई रेणू शंकर पवार व तिचा प्रियकर उमेश अरुण साळुंके अशी आरोपींचे नावे आहेत.या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोडलिंब येथे राहणारे रेणू पवार आणि उमेश साळुंके यांच्यात प्रेम संबंध होते.

या प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या चुटक्या या मुलाचा दोघांनी दीड महिन्यांपूर्वी गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह साडीत गुंडाळून व पुरावा नष्ट करण्यासाठी दुचाकी गाडीवर घेवून येवून ते पुरंदर तालुक्यातील 

भुलेश्वर घाटात फेकून दिला. दुसऱ्या लग्नासाठी बापाने पोटच्या लेकाची दिली सुपारी, मृतदेह आढळल्यानं खळबळया बाबत रेणू पवार हिच्या चुलत बहिणीने पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली.

 त्यानुसार जेजुरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेवून घाटात फेकून दिलेल्या चिमुकल्यांच्या मृतहेदाचे अवशेष शोधून काढले आहेत. दोघांवर जेजुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments