google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तहसील कार्यालयाचे तहसीलदार मा. संजय खडतरे यांचा आज 'सेवानिवृत्ती सत्कार सोहळा

Breaking News

सांगोला तहसील कार्यालयाचे तहसीलदार मा. संजय खडतरे यांचा आज 'सेवानिवृत्ती सत्कार सोहळा

 सांगोला तहसील कार्यालयाचे तहसीलदार मा. संजय खडतरे यांचा आज 'सेवानिवृत्ती सत्कार सोहळा


सांगोला तालुक्याचे लोकप्रिय तहसीलदार संजय भगवान खडतरे यांची यांची महसूल विभागात ३० वर्षे सेवा पूर्ण करून आज ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्त निमित्त कार्यक्रमाचे रामकृष्ण व्हिला गार्डन वाढेगाव रोड,

 सांगोला गुरुवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सायं. ६.०० वाजता निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सांगोला व परिसरातील तालुक्यातील नेते मंडळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

तहसीलदार संजय खडतरे यांच्या सेवानिवृत्त सत्कार सोहळा कार्यक्रमास सांगोला तालुक्याचे आ. शहाजीबापू पाटील, मा. आ. दिपकआबा साळुंखे पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह सर्व नेतेमंडळीपदाधिकारी उपस्थित राहणार आहेत..

सांगोला नगरीत तहसीलदार संजय खडतरे रुजू झाल्यापासून गोरगरीब जनतेचे लोकांचे त्यांच्या काळात पूर्ण केलेले आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने सांगोल्याच्या जनसेवेसाठी नियुक्त केली होती गोरगरीब जनतेचे सेवक म्हणून तहसीलदार संजय खडतरे नावाजले जात आहेत,

 ज्या ज्या ठिकाणी सेवा बजावली तेथे छाप पाडली. गोर गरीब, अडले - नाडल्याच्या मदतीला जात कामाचा झपाटा ठेवला. त्यांच्या कामाची लकब आणि झटपट निर्णय यामुळे लोकांमधील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून संजय खडतरे यांची ओळख बनली.

Post a Comment

0 Comments