सांगोला नगरपरिषदने पथविक्रेत्यांसाठी स्वनिधी से समृद्धी अंतर्गत केले शिबिराचे आयोजन;
केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेची सुरवात पथ विक्रेत्यांचा उस्फुर्त प्रतिसाद
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला )
सांगोले : कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर केल्याने पथविक्रेत्यांचा रोजगार हिरावला. त्यांना उभारी मिळण्याकरिता केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेची सुरवात करण्यात आली. यामध्ये शहरातील भाजी, फळे, तयार खाद्य पदार्थ, चहा, भजीपाव,
अंडी, कापड, चप्पल, उत्पादित वस्तू, रस्त्यावरील केशकर्तन, चर्मकार, पानपट्टीधारक इत्यादींना व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळते भागभांडवलाचा पतपुरवठा केला जात आहे. राष्ट्रीयीकृत बँकेच्या सहकार्याने ही योजना राबविली जात आहे.
सांगोला नगरपरिषदेने पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) अंतर्गत शहरातील ३५८ इतक्या पथविक्रेत्त्यांना प्रथम (र.रु.१०,०००/-) तर १४९ पथविक्रेत्त्यांना द्वितीय (र.रु.२०,०००/-) व १८ इतक्या पथविक्रेत्त्यांना तृतीय (र.रु.५०,०००/-) कर्ज पुरवठा
शहरातील विविध बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. केंद्रशासनाने स्वनिधी से समृद्धी अंतर्गत ज्या पथ विक्रेत्यांनी लाभ घेतलेला आहे. अशा पथ विक्रेत्यांसाठी आठ योजनांचा लाभ मिळणार आहे.
याकरिता सांगोला नगरपरिषदेने पथ विक्रेत्यांना एकाच ठिकाणी आठ योजनांची माहिती व लाभ मिळण्याकरिता शिबिराचे आयोजन नगरपरिषद कार्यालय आवारात करण्यात आले होते.
सदर शिबिरास १६० हून अधिक पथ विक्रेत्यांनी सहभाग नोंदविला. या शिबिरास मार्गदर्शन करतेवेळी मा.मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी शहरातील पथ विक्रेत्यांनी या योजनेसाठी उस्फुर्त प्रतिसाद दिलेला असून प्रत्येकाने आपल्या सोबतच्या या योजनेपासून वंचित असलेल्या पथ विक्रेत्यांना या योजनेबद्दल माहिती द्यावी.
त्याच बरोबर प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबास सुरक्षित करावे असे सांगितले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. सुधिर गवळी यांच्या हस्ते पथ विक्रेत्यांना वार्षिक २० रुपये व ४३६ रुपये पर्यंतचे विमा संरक्षण प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
तसेच केंद्र शासनाच्या आठ योजनांचा लाभ या दोन दिवसीय शिबिराच्या माध्यमातून घेण्याचे आवाहन नगरपरिषदेकडून पथ विक्रेत्यांना करण्यात आले.
या कार्यक्रमास कार्यालयीन अधीक्षक श्री.स्वप्नील हाके, बँक व्यवस्थापक श्री.दिविक अग्रवाल(SBI), श्री दिपक गवळी(BOM),श्री प्रमोद हंगार्गे(UBI), श्री सागर माळी(BOI), याबरोबरच सर्व वित्तीय संस्थाचे बँकमित्र उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.प्रकल्प अधिकारी श्री योगेश गंगाधरे यांनी तर आभार प्रदर्शन समुदाय संघटक श्री बिराप्पा हाके यांनी केले.


0 Comments