google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भिमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी पुष्पहार अर्पण केले

Breaking News

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भिमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी पुष्पहार अर्पण केले

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त


भिमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी पुष्पहार अर्पण केले

सांगोला प्रतिनिधी :-फक्त दिड दिवस शाळेत जाणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे संघर्ष आणि विद्रोही विचारांचा धगधगता अंगार आहे. दीन-दुबळ्या व उपेक्षितांच्या जीवनाचे वास्तव चित्रण त्यांनी आपल्या विपुल साहित्यातून केले.

फकिरा,अमृत,आघात,आबी, आवडी, कापर्या चोर,गजाआड, गुऱ्हाळ, गुलाम, चिखलातील कमळ, चित्रा, पिसाळलेला माणूस, फरारी, माकडीचा माळ, रत्ना, रानबोका इ. अजरामर कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या फकिरा या कादंबरीचे जगातील अनेक भाषांत अनुवाद झाले. 

अतिशय सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेऊन अण्णाभाऊंनी या सगळया साहित्याची निर्मिती केली. जो घटक पूर्णपणे उपेक्षित आहे त्याला कथेचा नायक बनवण्याचं धाडस फक्त अण्णाभाऊंच्या लिखाणात आहे. शोषण, अन्याय, अत्याचाराला विरोध करणे हेच आयुष्याचे ध्येय मानले.

 संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील त्यांचे योगदान आणि उपेक्षितांच्या निर्जीव मनांना उभारी देणारे त्यांचे जिवंत साहित्य हा महाराष्ट्राच्या इतिहासातील अनमोल ठेवा आहे."ये आझादी झुठी है देश की जनता भुकी है" असा नारा देश स्वतंत्र झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी देणारे आण्णाभाऊच असू शकतात. 

असे भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय बापू बनसोडे त्यांनी सांगितले यावेळी भीमशक्ती संघटनेचे महाराष्ट्र राज्य मीडिया विभाग बबन चव्हाण भीमशक्ती संघटनेचे सांगोला तालुका अध्यक्ष संतोष साठे त्यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यात पुष्पहार अर्पण केले.

Post a Comment

0 Comments