सांगोला तालुक्यातील हातीद येथे कर्मयोगी आबासाहेब
या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात
कोळा (वार्ताहर शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज) : सांगोला तालुक्यातील हातीद येथे भाग्यविधाते चे स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख यांच्या जीवनावर आधारित प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या बहुप्रतिक्षित कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. चित्रीकरणामुळे जुनोनी कोळा हतीद परिसरातील नागरिकांनी गर्दी केले असल्याचे दिसून येत आहे.
या चित्रपटात प्रमुख भूमिका अनिकेत विश्वासराव यांची तर सह कलाकार हर्षद जोशी, विजय पाटकर, अभिनेत्री देविका दप्तरदार, अभिनेत्री निकिता सुखदेव, सैराट फेम अरबाज शेख, तानाजी गलगुंडे, अहेमद देशमुख, सुरेश विश्वकर्मा, प्रदीप वेलणकर,
अनिल नगरकर, छोटा पुढारी, वृंदा बाळ हे चंदेरी दुनियेतले तारे-तारका वेगवेगळ्या भूमिका साकारत आहेत. प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते, यांनी संगीत दिले आहे
तर गाणी बॉलीवूड सिंगर कुणाल गांजावाला आणि मनीष रांजणे यांनी गायली आहेत. छाया चित्रकार, कुमार डोंगरे, स्टील फोटोग्राफर राजेंद्र कोरे कस्टम डिझायनर संगीता चौरे पोर्णिमा मराठा एक्झिक्युटिव्ह प्रोडूसर अमजदखान शेख हे आहेत.


0 Comments