google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये स्व. मा. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Breaking News

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये स्व. मा. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये


स्व. मा. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

सांगोला प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)

    सांगोला तालुक्याचे आमदार लोकनेते माननीय डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज तंत्रयुक्त व डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालय

 सांगोला यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्रमिक दिन साजरा करण्यात येणार आहे.त्यानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.

     या विविध स्पर्धे पैकी मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी नऊ वाजता फक्त सांगोला शहरातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.या स्पर्धेसाठी लागणारे रंग साहित्य विद्यार्थ्यांनी स्वतः आणावेत.

    बुधवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये पहिली ते चौथी,पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा तीन गटातील विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा दुपारी एक वाजता येणार आहे यासाठी पाच मिनिटाचा वेळ केला आहे.

पहिली ते चौथी गटासाठी माझा मित्र, माझे बाबा, आमचे आबासाहेब स्वर्गीय डॉक्टर गणपतराव देशमुख असे विषय आहेत. तर पाचवी ते सातवी गटातील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी जीवनातील खेळाचे महत्व, माझा महाराष्ट्र, माझे आवडते व्यक्तिमत्व स्वर्गीय डॉक्टर गणपतराव देशमुख असे विषय आहेत. 

तर आठवी ते दहावी गटासाठी मानवी जीवनातील अंधश्रद्धा- एक शाप,कोरोना काळातील आमचे शिक्षण, माननीय डॉक्टर गणपतराव देशमुख यांचे कार्य असे विषय आहेत, पाच मिनिटे वेळ निश्चित केलेला आहे. तर ज्युनिअर कॉलेज व खुल्या गटातील विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा सकाळी नऊ वाजता सुरू होईल, 

यामध्ये ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी वैश्विक तापमान वाढ एक समस्या, ऑनलाइन शिक्षण फायदे आणि तोटे, राजकारणातील दीपस्तंभ माननीय डॉक्टर गणपतराव देशमुख तर सीनियर कॉलेज गटातील विद्यार्थ्यांसाठी शेती व आजची तरुणाई, 

भारत देशाची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, विधानसभेचे विद्यापीठ डॉक्टर गणपतराव देशमुख असे विषय आहेत. तर खुल्या गटासाठी संविधान व सध्याचे राजकीय परिस्थिती,शेतकऱ्यांचे कैवारी भाई गणपतराव देशमुख, कोरोना मध्ये हरवलेली मानवता असे विषय आहेत. यासाठी सात मिनिटे वेळ निश्चित केलेली आहे.

    गुरुवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.यामध्ये पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी, जूनियर कॉलेज व सीनियर कॉलेज असे गट तयार केलेले आहेत.

  वरील सर्व  गटातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, उत्तेजनार्थ अशी बक्षिसे व ट्रॉफी देण्यात येणार आहे.सर्व स्पर्धकांनी प्रथम आपली नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक शाळेने एकच गट पाठवावा. स्वतःचे रेकॉर्डिंग पेन ड्राईव्ह यूएसबी घेऊन यावेत. उशिराने येणाऱ्या स्पर्धकाचा विचार केला जाणार नाही.

     या विविध स्पर्धेसाठी सांगोला शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य हेमंत आदलिंगे,सीनियर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सिकंदर मुलानी व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दिनेश शिंदे सर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments