सांगोला शहरात शेकापने 13 तारखेच्या कार्यक्रमात आठवले साहेबांना अध्यक्ष
किंवा शुभहस्ते असा मान दयायला पाहिजे होता : सुरजदादा बनसोडे
सांगोला / प्रतिनिधी (समता नगरी न्यूज नेटवर्क सांगोला)
रामदासजी आठवले साहेब यांना केंद्रीय मंत्री ( भारत सरकार ) पदाचा दर्जा आहे तरीही साहेबांचे नाव फक्त उपस्थिमध्ये टाकल्यामुळे तालुक्यातील आंबेडकरी जनता व आरपीआय पदाधिकारी यांच्या भावना दुखावल्या सांगोला शहरात स्व. माजी आमदार डॉ. गणपतराव देशमुख तथा आबासाहेब यांचे विद्यालयाला नामकरण व पुतळा अनावरण कार्यक्रम रविवार 13 रोजी आयोजित केला
असून शेतकरी कामगार पक्षाने महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांना आमंत्रित केले आहे. त्या कार्यक्रम पत्रिकेत कार्यक्रमाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब तर शुभहस्ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा कार्यक्रम आहे.
आणि आंबेडकरी जनतेचे देशाचे सर्वोत्तम नेते व केंद्रीय मंत्री ( भारत सरकार ) डॉ. रामदासजी आठवले साहेब यांचे नाव फक्त उपस्थिमध्ये टाकल्यामुळे सांगोला तालुक्यातील आंबेडकरी जनतेच्या व आरपीआय पदाधिकारी यांच्या भावना दुखावल्या आहेत.
सांगोला तालुक्यातील राजकारणात आबासाहेब 55 वर्ष आमदार झाले, त्यांना आमदार करण्यामागे आंबेडकरी जनतेचे योगदान होते. सन 2019 च्या विधान सभेच्या निवडणुकीत डॉ. अनिकेत देशमुख यांना त्याच पद्धतीने आंबेडकरी जनतेने त्याच ताकतीनिशी मदत केली,
परंतु त्यांच्या बरोबर असणारी मंडळी त्या वेळी त्यांना सोडून गेली. आणि त्यांचा अल्प मतांनी पराभव झाला. पण आंबेडकरी जनता ही त्यांच्याबरोबर शेवट पर्यंत राहिली. शेवटी हा विद्यालय नामकरण व पुतळा अनावरण हा कार्यक्रम त्यांचा वयक्तिक आहे. त्यांनी ठरवायचं आहे
कोणाला किती मानाचं स्थान दयायच ज्या पक्षांनी विधानसभेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला विरोध केला त्यांना मनाचे स्थान दिले. वास्तविक पाहता ह्या कार्यक्रमात आठवले साहेबांना मानाचे स्थान मिळायला पाहिजे होते. अध्यक्ष किंवा शुभहस्ते करून परंतु तसे केले नाही.
त्यामुळे चळवळीतील कार्यकर्त्याला व आर पी आय पदाधिकारी म्हणून वाईट वाटणे स्वाभाविक आहे. सदरचा प्रकार आपण आठवले साहेबांच्या निदर्शनास आणून देणार आहे. असेही आरपीआय तालुका अध्यक्ष व मा. नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांनी सांगितले आहे.


0 Comments