google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रत्येक तालुक्याला बारा हजार लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापुरात येणार? जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या प्रशासनाला सूचना

Breaking News

प्रत्येक तालुक्याला बारा हजार लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापुरात येणार? जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या प्रशासनाला सूचना

 प्रत्येक तालुक्याला बारा हजार लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापुरात येणार?


जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या प्रशासनाला सूचना 

शासन आपल्या दारी अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यात मोठा कार्यक्रम घेण्याचे नियोजित आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून तारीख अंतिम लवकरच होणार आहे.

आपापल्या विभागाच्या अधिनिस्त तालुकास्तरीय प्रमुख व त्यांचे कर्मचारी गावोगावी जाऊन शासकीय योजनांच्या त्यांची निवड करावी. एका तालुक्यातून किमान बारा हजार लाभार्थी निश्चित करून यादी पंधरा दिवसात प्रशासनाला सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शासन आपल्या दारी उपक्रमाची पूर्वतयारी आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार,

उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, उपजिल्हाधिकारी रोहयो चारुशीला देशमुख, उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक तीन श्रवण क्षीरसागर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. ११ चे संतोष देशमुख,

महसूल तहसीलदार दत्तात्रय मोहोळे, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, राज्यात शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी “शासन आपल्या दारी” हे अभियान राबविले जात आहे.

या अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला ७५ हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी शासकीय योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी पवार यांनी “शासन आपल्या दारी” ह्या अभियानाची माहिती दिली.

Post a Comment

0 Comments