मोठी बातमी.... सध्याच्या राज्यातील राजकारणावर तरुणाई व्यक्त करतेय
तीव्र भावना नेते जोमात; कार्यकर्ते, जनता मात्र कोमात!
सांगोला, तालुक्यातील सध्या राज्याच्या राजकारणात राष्ट्रहित, महाराष्ट्रहित, लोकहित असे मोठे शब्द वापरून एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलेले सत्तेसाठी एकत्रित येत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तरुणाई मात्र आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त करीत आहेत.
कसेही असले तरी वरिष्ठ नेते मात्र जोमात तर कार्यकर्ते कोमात दिसत आहेत. पक्षांतर्गत गटबाजी सुरू झाल्याने दुसऱ्या फळीतील नेते, कार्यकर्त्यांवर कोणता झेंडा घेऊ हाती ? अशी वेळ आली आहे.
राज्याच्या राजकारणात शिवसेनेंतर्गत गटबाजीची बंडाळी क्षमते न क्षमते तोपर्यंत राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोर केली
आणि थेट मुख्यमंत्रिपद मिळवले. पक्ष, झेंडा यावरही हक्कदार झाले. या सेनेअंतर्गत थंडाची चर्चा थोडीशी थंड होतेय तोपर्यंतच राष्ट्रवादीचे अजित पवार
यांनी बंड करून आपल्या समर्थक आमदारांसह भाजप शिवसेनेच्या . सत्तेला पाठिंबा दिला. अजित पवार यांनी थेट विरोधी पक्षनेते पदावरून उपमुख्यमंत्रिपद मिळवले.
या अगोदरचे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार तर आता शिवसेना, भाजप व यामध्येही राष्ट्रवादी सामील झाली आहे. यातरुणांनी राजकारणात यावे कशासाठी व कोणासाठी?
राजकारणात तरुणांनी सामील होऊन लोकशाही बळकट करावी असे नेहमीच बोलले जाते. परंतु आजची परिस्थिती पाहता तरुणांनी कोणत्या पक्षात यावे,
आपण कोणती विचारधारा घ्यावी, आपल्या स्वकियांना आपण कशासाठी राजकारणात येत आहोत, कोणासाठी येत आहोत हे कसे पटवून द्यावे,
हेच कळत नसल्याचे तरुण बोलत आहेत. कारण ज्या विचारांची दिशा घेऊन पक्षीय राजकारण चालते तेच पक्ष, त्यांचे नेते मात्र सत्तेसाठी स्वार्थासाठी विचारधारा बाजूला करून एकत्रित येत असल्याचे चित्र दिसत आहे.
सध्याचे राजकारण फारच गढूळ होताना दिसत आहे. पक्षाची विचारधारा, ध्येयधोरणे बाजूला सारून "सत्तेसाठी सर्व काही ।" असेच चित्र आम्हास बघावयास मिळते. हे चुकीचे आहे.
तरुणांनी सध्याच्या राजकारणाची दिशा बदलण्याची गरज आहे. राजकारणात तरुणांनी यावी की नको असे झाले आहे.
- दत्ता टापरे, सदस्य, पाणी संघर्ष समिती -
सत्तेसाठी एकत्रित येणारे विविध पक्ष नेत्यांवर तरुणाईमधून मात्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सत्तेपासून आजची राजकारणी बाजूला राहू शकत नाहीत.
सत्तेसाठी पक्षाचे विचारधारा, जनहिताचे कार्यक्रम बाजूला सारून मंत्रिपदे मिळवण्यासाठी काहीही करत असल्याची टीका अनेक तरुण करीत आहेत. निवडणुकांमधून खालच्यापातळीला येऊन टीका-टिप्पणी करणारे, भ्रष्टाचाराचे यादी समोर ठेवून डोकी भडकवणारे,
एकमेकांच्या विरोधातील लढवय्ये उमेदवार निवडणुकीनंतर मात्र सत्तेसाठी एक होताना दिसत आहेत. या परिस्थितीवर अनेक जण काय बोलावे हेच कळत नसल्याचे उघडपणे संदिग्ध होऊन बोलत आहेत.शहाणे व्हा, पोटापाण्याचं बघा.....
राजकारणामध्ये तरुणांनी सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे. समाज व्यवस्था चांगली करायची असेल तर सुशिक्षित तरुणांनी राजकारणात येणे महत्त्वाचे आहे. परंतु सध्या विचारधारेला बगल देऊन स्वतःच्या
स्वार्थासाठी एखाद्या गटात किंवा पक्षात अनेक जण सामील होताना दिसत आहेत. सध्याच्या राजकीय वातावरणामध्ये सर्वच प्रमुख पक्षाचे नेतेमंडळी एकत्रित येत असताना गावातील स्थानिक कार्यकर्त्यांनी
निवडणुकीसाठी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणे, एकमेकांचा द्वेष करणे बरोबर नाही. "आमचं आयुष्य असच दंड थोपटण्यात गेलं, आता तुम्ही तरी शहाणे व्हा पोरांनो, पोटापाण्याचं बघा!" असा सल्ला काही ज्येष्ठ मंडळी तरुणांना देत आहेत.
स्व. आबासाहेब (गणपतराव देशमुख) यांनी ५५ वर्षे एकाच पक्षात, एकच झेंडा घेऊन सर्वसामान्यांसाठी लढत होते. अशी पक्षनिष्ठा सध्याच्या राजकारणात मला कमी होताना दिसत आहे.
परंतु तरुणांनी याकडे दुर्लक्ष करून समाजकार्यासाठी एकत्रित येऊन राजकारणाला नवी दिशा देण्याची गरज आहे. स्व. आबासाहेबांचे विचार सर्वांनी आत्मसात करण्याची
आज गरज निर्माण झाली आहे. • डॉ. बाबासाहेब देशमुख, अध्यक्ष, पुरोगामी युवक संघटना
आजच्या राजकारणात कोण कोठेही जातोय. कोणता पक्ष कधीही एकत्रित येतोय. काल टीका करणारे आज एकाच बाकावर बसलेले दिसतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ही परिस्थिती फारच विचित्र असून स्थानिक पातळीवरील तरुणांनी राजकारणासाठी द्वेष करू नये. नेते केव्हाही एकत्रित होतात आपणही नेहमी एकत्रितच होऊन निवडणुका लढवू या. धनंजय चव्हाण, हलदहिवडी, ता. सांगोला


0 Comments