ब्रेकिंग न्यूज.... सप्टेंबरपासून राज्यात स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा उडणार….
महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदारयादी प्रसिद्ध करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश व अधिसूचना निघाली..
महाराष्ट्र शासन राज्य पत्रामध्ये राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाचे
उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी बुधवार दि. 05 जुलै 2023 प्राधिकृत प्रकाशनात महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती, ग्रामपंचायत,
नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षक आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यातील भाग चार ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले
आदेश व अधिसूचना त्यामध्ये दि. 01 जुलै 2023 या दिवशी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार यादी
माहे सप्टेंबर 2023 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणाऱ्या महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समिती
तसेच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्यासाठी अधिसूचना करण्यात आलेली आहे.


0 Comments