google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला विद्यामंदिर शाळेसमोर ट्राफिक हवालदार नेमण्याची ठाकरे गटाच्या शिवसेनेने केली मागणी

Breaking News

सांगोला विद्यामंदिर शाळेसमोर ट्राफिक हवालदार नेमण्याची ठाकरे गटाच्या शिवसेनेने केली मागणी

 सांगोला विद्यामंदिर शाळेसमोर ट्राफिक हवालदार


नेमण्याची ठाकरे गटाच्या शिवसेनेने केली मागणी

सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)

सांगोला विद्यामंदीर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथील गेटसमोरुन पंढरपूर हायवे तसेच अकलूज हायवे जात असलेने वाहनांची रहदारी खुप आहे. 

त्यामुळे शाळा भरतेवेळी सकाळी 10 ते 11.30 या वेळेत सकाळी व शाळा सुटते वेळी सायंकाळी 4.30 ते 5.30 या वेळेत वाहतुकीची कोंडी होत असते. शाळेतील मुलांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेवून जावे लागते. तसेच काही विद्यार्थ्यांना ने आण करणेसाठी

 पालक ही मोटर सायकलसह व शाळेच्या मुलांना ने आण करणा-या वाहनांमुळे गर्दी होत असते. तेथुन जड वाहने भरधाव वेगाने जातात व येतात. या कारणाने विद्यार्थ्यांच्या जीवीतास धोका निर्माण होण्याची दाट शक्यात व संभावना आहे.

 या सर्व बाबींचा विचार करता तेथे ट्राफिक हवलदार यांची नेमणूक होणे गरजेचे आहे. जणेकरुन येजा करणा-या वाहन धारकांना शिस्त लागेल व अपघाता सारख्या घटना घडणार नाहीत. मुलांना शाळेत येणेसाठी जाणेसाठी त्रास होणार नाही.

 तरी सदर निवेदनाचा सहानुभुतीपूर्वक विचार करुन सदर ठिकाणी वाहतुक नियंत्रण कक्ष करावा किंवा त्या त्या वेळेत ट्राफिक हवलदार यांची नेमणूक करावी या बाबतचे निवेदन शिवसेना युवा सेना पदाधिकारी यांनी तहसीलदार यांना दिले आहे 

यावेळी  शिवसेना नेते हरिभाऊ पाटील शिवसेना तालुका समन्वयक भारत मोरे युवा सेना शहरप्रमुख सौरभ चव्हाण शिवसेना शाखाप्रमुख समाधान चव्हाण सुशील गवळी संतोष खटकाळे लक्ष्मण बाबर महेश करांडे विष्णू देव करांडे सचिन करंडे आदी शिवसेना युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments