google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली 3,500 कोटींची भूमी हडपणारा ‘वक्फ कायदा’ रद्द करा !सांगोला येथे हिंदू जनजागृती समिती च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर

Breaking News

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली 3,500 कोटींची भूमी हडपणारा ‘वक्फ कायदा’ रद्द करा !सांगोला येथे हिंदू जनजागृती समिती च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली 3,500 कोटींची भूमी हडपणारा ‘वक्फ कायदा’ रद्द करा !


सांगोला येथे हिंदू जनजागृती समिती च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर

सांगोला - वक्फ कायद्याद्वारे वक्फ बोर्डाला मुसलमानांचीच नव्हे, तर अन्य धमिर्यांचीही धार्मिक संपत्ती बळकावण्याचा अधिकार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

 छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची 3,500 कोटी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे.

 त्यामुळे समाजात संतापाची लाट पसरली आहे. अशा प्रकारे वक्फ बोर्डाने देशातील लाखो एकर भूमी हडपली आहे. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली 3500 कोटींची भूमी ‘लॅण्ड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्फ’चा काळा कायदा रद्द करण्यात यावा, 

अशी मागणी शुक्रवार, 14 जुलै या दिवशी सांगोला येथे हिंदू जनजागृती समिती च्या वतीने विधी आणि न्याय मंत्री, भारत सरकार यांच्या नावे तहसीलदार यांच्या कडे निवेदनद्वारे केली आहे. तहसीलदार यांच्या वतीने राजकुमार जुंधळे साहेब यांनी हे निवेदन स्वीकारले.

यावेळी सर्वश्री नवनाथ कावळे, प्रशांत राजमाने, अजिंक्य देशमुख, गणपत पटेल, डॉक्टर मानस कमलापूरकर, ज्ञानेश्वर उबाळे, कैलास राणावत, अक्षय क्षीरसागर, संतोष पाटणे, मोहन चौधरी हे उपस्थित होते.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, छत्रपती शाहू महाराजांनी सदर भूमी ही मुसलमानांसह अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाचे साधन मिळावे, म्हणून दिली होती. ती केवळ मुसलमानांसाठी वा धार्मिक प्रयोजनासाठी दिलेली नव्हती. असे असतांना वक्फ कायद्याचा दुरुपयोग करून त्यांची भूमी बळकावून मागास समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे.

 अशाच प्रकारे तामिळनाडूतील एक संपूर्ण गाव आणि त्या गावातील 1500 वर्षांपूर्वीचे श्रीचंद्रशेखर स्वामींचे मंदिरही वक्फ बोर्डाने बळकावून ती ‘वक्फ बोर्डा’ची संपत्ती असल्याचे घोषित केले आहे. जो धर्मच मुळी 1400 वर्षांपूर्वी अस्तित्त्वात आला, तो 1500 वर्षांपूर्वीच्या हिंदु मंदिराचा मालक कसा काय होऊ शकतो ? 

वक्फ कायद्यामुळे गुजरातमधील हिंदूंचे द्वारका बेट, सुरत महानगरपालिका, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील चंद्रशेखर आझाद पार्क, ज्ञानवापी, मथुरा आदी अनेक जागा वक्फची संपत्ती घोषित करण्याचा सपाटा चालू आहे. हे थांबायला हवे, यासाठी देशभर आंदोलन ही करण्यात आले आहे.

वर्ष 2009 मध्ये 4 लाख एकर भूमी असलेल्या ‘वक्फ बोर्डा’कडे वर्ष 2023 मध्ये 8 लाख एकर भूमी कशी काय आली ? इतक्या मोठ्या प्रमाणात वक्फ बोर्ड भूमी अधिग्रहित करत असतांना सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या का?

 असे प्रश्न उपस्थित करत याविषयी केंद्रीय स्तरावर तपास व्हायला हवा, तसेच ‘वक्फ बोर्डा’ची संपूर्ण चौकशी करून बेकायदेशीरपणे लाटलेली सर्व भूमी संबंधितांना परत केली पाहिजे. यात दोषी आढळणार्‍यांना कठोर कारवाई केली पाहिजे, अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या.

आपला नम्र,

राजन बुनगे

हिंदू जनजागृती समिती

Post a Comment

0 Comments