दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे
मा.नगराध्यक्षा सौ. राणीताई माने व गटनेते आनंदा माने यांच्या हस्ते सत्कार संपन्न
सांगोला/प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क :
दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे मा. लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने व गटनेते आनंदा माने यांच्या हस्ते व मुजावर परिवारातील मान्यवरांच्या प्रमूख उपस्थितीत सत्कार संपन्न झाला.
दहावीच्या परीक्षेमध्ये 1) शाहीद जमीर मुजावर
२) जिया तोफिक मुजावर ३)आलिशा जाकीर मुजावर
४ )यास्मिन जावेद मुजावर या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे चांगले यश मिळविल्याबद्दल त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी मा. लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी त्यांच्या मनोगतामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या समारंभाचे आयोजक रउफ मुजावर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. या सत्कार सोहळ्यासाठी फिरोजभाई खतीब, ज्येष्ठ मार्गदर्शक इलाही मुजावर, अंबिर मुजावर, इन्नूस मुजावर,
तोफिक मुजावर, कयुम मुजावर सर, झाकीर मुजावर, साहिल खतीब यांच्यासह विद्यार्थी-पालक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


0 Comments