google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील महुद मध्ये डीजे लावण्यास बंदी ग्रामपंचायत ने केला ठराव

Breaking News

सांगोला तालुक्यातील महुद मध्ये डीजे लावण्यास बंदी ग्रामपंचायत ने केला ठराव

सांगोला तालुक्यातील  महुद मध्ये डीजे लावण्यास


बंदी ग्रामपंचायत ने केला ठराव

महुद: महूद (ता. सांगोला)येथील दिनांक 31/0 5/ 2023 रोजी ग्रामपंचायतची ग्रामसभा भरली होती त्यामध्ये महुद येथील डॉक्टर असोसिएशन यांनी ऐनवेळी आलेल्या विषयावर

 डीजे मुळे गावाला होणाऱ्या परिणामामुळे डीजेविरोधात महिला ग्रामसभा व पुरुष ग्रामसभा याविषयी ठराव घेण्याचा अर्ज दाखल केला

 होता तेव्हा ग्रामसभेतील ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी चर्चा करून महूद गावाचा सारासार विचार केला तर लोकसंख्या हे 20 ते 25 हजार असलेले गाव असून डीजे या आधुनिक वाद्याचा सर्व ग्रामस्थांना

 ज्यांना हृदय विकार त्रास आहे, डीजेच्या प्रचंड वाद्यामुळे लहान मुलांच्या कानाचे पडदे फाटने, वयोवृद्ध लोकांना बहिरेपणा, ऐकण्यास कमी येणे

 इत्यादी प्रकार घडत असून या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून महिला व पुरुष डॉक्टर असोसिएशन

 यांनी डीजेच्या आधुनिक वाद्यावर अभ्यास करून त्याचा नागरिकांवर किती कोणता परिणाम होणार आहे

 याचा अभ्यास करून महूद मधील सर्व डॉक्टरांनी व ग्रामस्थांनी डीजे बंदी साठी ग्रामसभेमध्ये अर्ज दिला होता

 सदरच्या अर्जावर ग्रामसभेमध्ये चर्चा होऊन गावामध्ये कोणत्याही कार्यासाठी डीजे ला परवानगी दिली जाणार नाही

 व कोणी लावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सर्वानुमते ठरले आहे

 दिनांक 05/06/ 2023 पासून डीजे हे आधुनिक वाद्य गावात वाजणार नाही. ग्रामस्थांनी आधुनिक डीजे न लावता पारंपारिक वाद्यांचा वापर करावा असे आवाहन केले आहे 

यामुळे ग्रामपंचायतीच्या निर्णयाचे स्वागत महुद परिसरातील नागरिक करत आहेत.

Post a Comment

0 Comments