चित्रपट .'खेड्यातलं येडं प्रेम ' ३० जुन रोजी येणार पडद्यावर...विदर्भातील कलावंतांची कलाक्षेत्रात उंच भरारी
चित्रपट .’खेड्यातलं येडं प्रेम ‘ ३० जुन रोजी येणार पडद्यावर…
चित्रपटाची निर्मिती करून उमटविला वेगळा ठसा निर्माता ग्रामीण भागातील अशोकराव तायडे पाटील यांचे धाडसी पाऊल
संजय तायडे बोरगाव मंजू – आज ग्रामीण भागातील धाडसी पाऊल उचलले ते एका सर्व सामान्य कुटुंबातील
एका ध्येयवेड्या तरुणाने, कुठलाही सिने सुष्टीतील वारसा नाही, केवळ आपले काम करुन वेळ मिळाला तेव्हा कधी काळी
एखाद्या सिनेमा गृहात चित्रपट पाहिला असेल एवढाच अनुभव,पण ग्रामीण भागातील तरुण मागे नाहीत कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होतोय हे दाखवून दिले आहे
बोरगाव मंजू येथील एका चित्रपटाच्या माध्यमातून, निर्माते अशोक तायडे पाटील यांनी, त्यांच्या चित्रपटांचा पोस्टर व ट्रेलर लाँच सोहळा बोरगात पार पडला,
या वेळी हजारो चित्रपट प्रेमी सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते, त्यांच्या शुभ हस्ते मोठ्या थाटात पार पडला.
मुंबई, पुणे, कोल्हापूर सह विदर्भातील कलाक्षेत्रात अनेकांनी चित्रपट निर्मिती केली आहे,पण त्यापैकी या क्षेत्रात
धाडसी पाऊल उचलले ते एका ध्येयवेड्या तरुणाने तोही खेड्यातील तरुण वयात मोहजालात पडण्याचा स्वतः लवलेशही नाही,
पण खेड्यातल्या सह शहरातील आजच्या तरुणांचे वास्तव सह बोध घ्यावा या पार्श्वभूमीवर निर्माते अशोक तायडे यांनी आपल्या कुशलतेने मेहनतीच्या जोरावर चित्रपट निर्मितीमध्ये आपला वेगळा ठसा निर्माण केल,
दरम्यान येत्या 30 जून ला खास विदर्भातील मातीचा गंध असलेला हृदयस्पर्शी मराठी चित्रपट खेड्यातलं येडं प्रेम महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे,
या चित्रपटाचे निर्माते अशोक श्रीराम पाटील, कार्यकारी निर्माते डॉ. राजकुमार वैराळे, दिग्दर्शक कृष्णगोपाल वानखडे,
पटकथा गित माणिक गवई यांनी शब्दबद्ध केले आहे,तर संगीत प्रेमचंद कांबळे , छायांकन निलेश वानखडे , चित्रपटाची जमेची बाजु म्हणजे, धुमधडाका ,
दे दणादण फेम प्रेमाकीरण विषेश भुमिकेसह विदर्भातील मयूर, प्रगती पाटील, संदिप दिशा, स्वप्नाली बंड, स्वर्णपाल डोंगरे, रवि नवलकर,
शाम पिपळकर, डॉ राजकुमार वैराळे, ॲड बॉबी देशमुख, राहूल वानखडे, विमल भगत, भागवत केंद्रे, दिनेश डोंगरे,ललीता भगत, गुरु पाटील, गौरी पाटील,
बालकलाकार अजिंक्य पाटील, गुंजन वानखडे, सह विशेष भुमिकेत कृष्णगोपाल वानखडे पडद्यावर झळकणार आहेत, दरम्यान चित्रपटाचा पोस्टर व ट्रेलर लॉन्च सोहळा संत गजानन महाराज सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला,
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बळीराम सिरसकार हे होते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष शिरीष धोत्रे,जिप गटनेते
ज्ञानेश्वर सुलताने , जि प, सदस्या निता गवई सरपंच अनिता खेडकर, माळी महासंघाचे अध्यक्ष सुभाष सातव , डॉ. केशव काळे, डॉ. संतोष हूसे, उमेश मसने,
रामदास खंडारे, दिनकर वाघ,शेख साबीर भाई, माजी उपसभापती वामनराव तायडे, उत्तम म्हैसने, डॉ सचिन दायमा, उत्तमराव म्हैसने, आदी मान्यवर उपस्थित होते, प्रास्ताविक निर्माते अशोक पाटील यांनी केले,
सूत्रसंचालन मनिष तिवारी, आभार डॉ राजकुमार वैराळे यांनी केले, प्रसंगी आबालवृद्ध सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


0 Comments