google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला विज्ञान महाविद्यालयामध्ये "शिवस्वराज्य दिन" साजरा

Breaking News

सांगोला विज्ञान महाविद्यालयामध्ये "शिवस्वराज्य दिन" साजरा

सांगोला विज्ञान महाविद्यालयामध्ये "शिवस्वराज्य दिन" साजरा



                 सांगोला विज्ञान महाविद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक हा दिवस "शिवस्वराज्य दिन" म्हणून साजरा करण्यात आला. 

सुरुवातीला प्रमुख पाहुणे प्रा संभाजीराव शिंदे प्राचार्य डॉ सिकंदर मुलाणी व उपस्थितांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

               कार्यक्रमाचे प्रमुख पाहणे संभाजीराव शिंदे आपले मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी राजे यांच्या राज्यकारभाराविषयी असलेली सर्वसमावेशकता स्पष्ट करतात व सर्व जाती, धर्म, पंथ,  या सर्व लोकांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना करतात. 

अशा या स्वराज्य राज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी राजे हे एकमेव राजे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सामाजिक धार्मिक कार्य हे जगाला प्रेरणा देणारे आहे .

तेव्हा आदर्शवादी व्यक्तींचा विचार डोळ्यासमोर ठेवून आपण सामाजिक कार्य केले पाहिजे असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे 

अध्यक्ष प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र त्यांचे कार्य व त्यांचा शिवराज्याभिषेक याच्याविषयी विवेचन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. अशोकराव वाकडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .अविनाश लोखंडे यांनी केले  व कार्यक्रमाचे आभार नियोजित-

अनियोजित समितीचे चेअरमन डॉ रिटे दीपक यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments