google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भीम आर्मीचे चंद्रशेखर आजाद रावण यांच्यावर झालेल्या गोळीबार व खूनी हल्ल्याच्या निषेधार्थ सांगोला तहसील कार्यालयास निवेदन

Breaking News

भीम आर्मीचे चंद्रशेखर आजाद रावण यांच्यावर झालेल्या गोळीबार व खूनी हल्ल्याच्या निषेधार्थ सांगोला तहसील कार्यालयास निवेदन

 


भीम आर्मीचे चंद्रशेखर आजाद रावण यांच्यावर झालेल्या गोळीबार


व खूनी हल्ल्याच्या निषेधार्थ सांगोला तहसील कार्यालयास निवेदन

भीम आर्मीचे चंद्रशेखर आजाद रावण यांच्यावर उत्तर प्रदेश सहारानपुर येथे त्यांच्या गाडीवर गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा जो प्रयत्न करण्यात आला आहे.

त्याच्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक ३०-६-२०२३ रोजी सकाळी 12 वाजता सांगोला येथे भीम आर्मीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मयूर गडहिरे यांच्या वतीने सांगोला तहसील कार्यालयाचे महसूल नायब तहसीलदार गजानन बेले व सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंत कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.

 यावेळी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष मयूर गडहिरे यांनी भीम आर्मीचे चंद्रशेखर आजाद रावण यांना झेड प्लस संरक्षण देण्यात यावे व या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे सांगितले.

 यावेळी निवेदन देताना स्वाभिमानी होणार समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव जावीर नितीन होवाळ दीपक ऐवळे मच्छिंद्र धनवडे सुरेश पारसे मोहसीन खतीब समाधान जावीर राष्ट्रवादी काँग्रेसचे रविदादा चौगुले इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments