google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला सायकलर्स क्लबचा वारी संमेलनात सत्कार उत्तम आरोग्य करिता सायकलिंग काळाची गरज:- नीलकंठ शिंदे सर

Breaking News

सांगोला सायकलर्स क्लबचा वारी संमेलनात सत्कार उत्तम आरोग्य करिता सायकलिंग काळाची गरज:- नीलकंठ शिंदे सर

 सांगोला सायकलर्स क्लबचा वारी संमेलनात सत्कार उत्तम आरोग्य करिता सायकलिंग  काळाची गरज:- नीलकंठ शिंदे सर


सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)

सांगोला सायकलर्स क्लबचे सदस्य यांचा सायकल संमेलनात जल्लोषात उत्साही वातावरणात सत्कार संपन्न झाला.

पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त सायकलवारी 2023 भव्य रिंगण सोहळा व स्नेह मेळावा रेल्वे स्टेशन हेलिपॅड  प्रांगणात आयोजित करण्यात आला होता 

या दोन दिवसीय सायकल अधिवेशनात पंढरपूर सायकलर्स क्लब व बारामती सायकल फाउंडेशन यांच्या वतीने पंढरपूर येथे प्रमुख पाहुणे उमेशमालक परिचारक

 व इतर मान्यवर यांच्या हस्ते सांगोला ते घुमान (पंजाब) सायकल रॅली यशस्वी पूर्ण केल्याबद्दल सांगोल्यातील विक्रमवीर सायकलिस्ट नीलकंठ शिंदे सर ,प्रकाश खडतरे ,प्रशांत राजमाने, जतचे सायकलिस्ट अनिल मदने सर

 ,निलेश मेहत्रे, बाबुराव लाडे यांचा सन्मान करून विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले . यावेळी बोलताना उत्तम आरोग्य करिता सायकलिंग  काळाची गरज असल्याचे प्रतिपादन नीलकंठ शिंदे सर यांनी केले.

 यावेळी अनेक सायकलिस्ट मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करून या पुढील काळात प्रदूषण मुक्त सायकलिंग व निसर्ग संवर्धनाची प्रतिज्ञा देण्यात आली .या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून सायकल प्रेमींची लक्षणीय उपस्थिती होती. 

सांगोला येथील या सायकलिस्टने दक्षिण -उत्तर  राईड यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल तमाम महाराष्ट्रातील सायकलिस्टकडून अभिनंदन व कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments