google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..आधी पाच मंत्र्यांना डच्चू, मगच विस्तार! भाजपच्या प्रस्तावामुळे मिंधे गटाची पाचावर धारण

Breaking News

मोठी बातमी..आधी पाच मंत्र्यांना डच्चू, मगच विस्तार! भाजपच्या प्रस्तावामुळे मिंधे गटाची पाचावर धारण

 मोठी बातमी..आधी पाच मंत्र्यांना डच्चू, मगच विस्तार! भाजपच्या प्रस्तावामुळे मिंधे गटाची पाचावर धारण


सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर लगेचच मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी आशा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या आमदारांना होती.

 मात्र, आधी सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांना डच्चू द्या, मगच विस्तार केला जाईल, असा प्रस्ताव भाजपकडून देण्यात आला आहे.

यामुळे शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटात सहभागी झालेल्यांची चांगलीच पाचावर धारण बसली आहे. भाजपच्या प्रस्तावामुळे मुख्यमंत्री शिंदेही टेन्शनमध्ये आले असून त्यांच्या समर्थकांत सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

 या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनीच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शहा यांच्यासोबतच्या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले. यामुळे राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. 

मात्र, या विस्तारासाठी भाजप पक्षश्रेष्ठाRनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील 

आणि अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री संजय राठोड या पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची अट घातली आहे. याबाबत मुख्यमंत्री शिंदे निर्णय घेत नाहीत

 तोपर्यंत विस्तार लांबणीवर पडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील मंत्र्यांच्या कामगिरीवर भाजपकडून नजर ठेवली जात आहे. 

त्यासाठी भाजपने स्वतःची खास यंत्रणा उभी केली आहे. या यंत्रणेने शिंदे गटातील पाच मंत्र्यांची कामगिरी ही सुमार दर्जाची असून आगामी निवडणुकीत त्याचा फटका बसण्याची

 शक्यता असल्याचा अहवाल पक्षश्रेष्ठाRना दिला आहे. या अहवालाच्या आधारे पाच मंत्र्यांना डच्चू देण्याचा प्रस्ताव भाजपने शिंदे गटाला दिला आहे.या कारणांसाठी मिळणार नारळ

गुलाबराव पाटील - ग्रामीण, शहरी भागातील पाणीपुरवठय़ाची कामे अपेक्षेनुसार झाली नाहीत. त्यामुळे ग्रामीण मतदारांत सरकारविषयी नाराजी.

तानाजी सावंत - सार्वजनिक आरोग्य व्यावस्थेत कोणतीच सुधारणा नाही. प्रत्येक जिह्यात स्वतःचे 'खासगी सचिव' ही नेमले आहेत.

संजय राठोड - अन्न औषध प्रशासन विभागातील वाढता भ्रष्टाचार आणि औषधे विक्रेत्यांच्या तक्रारी. युवतीच्या आत्महत्या प्रकरणाने प्रतिमा मलिन.

अब्दुल सत्तार -केंद्राच्या कृषी योजनांचा लाभ कृषिमंत्री म्हणून खालपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात अपयश. टीईटी घोटाळ्याशी थेट संबंध.

संदिपान भुमरे - रोजगार हवी आणि फलोत्पादन योजना प्रभावीपणे राबविण्यात अपयश. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेपाचा आरोप.

भ्रष्टाचारी गद्दारांना मंत्रीपदावरून हटवणार की महाराष्ट्र लुटल्याचे बक्षीस देणार!

आधीही मी म्हणालो होतो की, कर्नाटकातले यांचे सरकार जर 40 टक्केवाले असेल तर महाराष्ट्रातले सध्याचे घटनाबाह्य सरकार 100 टक्के भ्रष्टाचारी आहे, 

आर्थिकदृष्टय़ाही आणि नैतिकदृष्टय़ाही! असे ऐकण्यात आले आहे की, गद्दार गँगपैकी 5 मंत्र्यांना मंत्रीपदावरून काढून टाकण्याची आज्ञा देण्यात आली आहे. 

त्यांच्या सहकारी पक्षातील कोणी सांगू शकेल का, हे खरे आहे की खोटे? गद्दार भ्रष्टाचारी आहेत हे खरंच आहे, फक्त त्यांना काढून टाकण्यात येणार आहे

 की भ्रष्टाचार करून महाराष्ट्राला लुटल्याबद्दल बक्षीस म्हणून बढती मिळणार आहे, एवढंच जनतेला जाणून घ्यायचंय, असे खरमरीत ट्विट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments