सांगोला तालुक्यातील कोळे येथील बहुतांश रोडलाइट व हाय मास्ट पोलवरील दिवे बंद अवस्थेत...!!!
सांगोला (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क):- शासनाने लाखों रुपये खर्च करून कोळे गाव लख्ख प्रकाशमय केले होते परंतु आता सद्या कोळे ता.सांगोला
येथील बहुतांश प्रमाणात रोडलाईट्स पथदिवे व हायमास्ट पोल वरील लाईट बंद अवस्थेत असून कोळे ग्रामपंचायत कार्यालयाकडे तेथील स्थानिक राहणाऱ्या नागरिकांनी तोंडी व लेखी तक्रार करून सुद्धा ग्रामपंचायत कार्यालय कोळे
कडून अद्याप अजुन कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.यामध्ये प्रामुख्याने कोळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथील गेली कित्येक महिने पासून हायमास्ट पोलवरील लाईट बंद आहे.
हायमास्ट पोलवरील लाईट नसल्याने रात्री अपरात्री उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत.भवानी टेक मंदिर परिसर हायमास्ट गेली 3 महिने पासून सद्या बंद अवस्थेत आहे. खांडेकर गल्ली, कुंभार गल्ली, माने गल्ली,
म्हाकुबाई मंदिर परिसरातील रोडलाईट पोलवरील लावण्यात आलेले सर्व पथदिवे बंद आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया कोळे नाजिक असणाऱ्या रोडलाईट बंद अवस्थेत आहे. हातेकर समाज मंदिर जवळील हायमास्ट व शमशान
भूमी येथील हायमास्ट पण सद्या बंद अवस्थेत आहे.तरी वरील सर्व बाबीवर विचार करून ताबडतोब असणारे रोडलाईट पोलवरील लाईट व ठिकठिकाणी बसवण्यात आलेल्या ग्रामपंचात हद्दीतील हायमास्ट सुरू करावेत अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
कोळे स्थानिक ग्रामस्थ:- दररोज रात्री म्हाकूबाई मंदिर परिसरात मोठ्या वाहनांची भरपूर प्रमाणात ये - जा होत असते एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी कोळे ग्रामपंचायत कार्यालया कडून बंद अवस्थेत असलेल्या रोडलाइट्स व हायमास्ट पोलवरील दिवे ताबडतोब सुरू करावे ही विनंती.
0 Comments